Advertisement

Responsive Advertisement

लाख फितूर झाले तरी येणाऱ्या निवडणुकीत डौलाने भगवा फडकणारच, पिशोर जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा संपन्न


कन्नड : लाख फितूर झाले तरी कडवट शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेचा विश्वास हा आपला पाया आहे. त्यामुळे पैसे आणि सत्तेच्या लालसेपोटी आले किती गेले किती, काही फरक पडत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात जो जातो तो मातीत मिसळतो. हा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत छत्रपती शिवरायांचा भगवा डौलाने फडकणारच, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
कन्नड येथे आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे,आमदार उदयसिंग राजपूत  यांच्या उपस्थिती मध्ये मेळावा पार पडला.
मेळाव्यास उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवले, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, युवा सेना जिल्हा समनव्यक उमेश मोकासे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ डहाके, शिवाजी थेटे, संजय पिंपळे, दिलिप मुठ्ठे, सरपंच अशोक दाबके, विभागप्रमुख विलास पवार, विलास पाटणी, शंकर नवले, गंम्पु जाधव आदींसह पिशोर नाचनवेल विभागाचे शिवसैनिक, नागरिक उपस्थित होेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या