Advertisement

Responsive Advertisement

बनोटी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत “थोडेसे मायबापासाठी पण” मोफत आरोग्य तपासणी.

 सोयगाव/(विजय पगारे)

तालुक्यातील बाजारपेठेची समजला जाणारी बनोटी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत व ग्रामीण रूग्णालया मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.
सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.
बनोटी ग्रामपंचायतीचे सरंपच मुरलीधर वेहळे,व ग्रामसेवक एस.एस.भालेराव सदस्यानां लक्षात आले.बनोटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सहकार्याने व ग्रामीण रूग्णालय बनोटी यांच्या संयुक्त विद्यमाने “थोडेसे माय बापा साठी पण ” कार्यक्रम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे बनोटी येथील ग्रामीण रूग्णालयात येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात गावातील व परिसरातील ५०/६० नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची तज्ज्ञ डाँक्टरांमार्फत उच्च रक्तदाब,रक्तशर्करा,

हाडांमधील कँल्शियमची मात्रा तपासणी करण्यात आली.ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे डॉ.बाजीराव पाडवी,डॉ. हरिष पाटील,यांनी आवाहन केले आले.यावेळी सरपंच मुरलीधर बापू,ग्रामसेवक एस.एस.भालेराव,सदस्य भुषण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपअध्यक्ष मुकेश काका जैन, ऋषिकेश पाटील,
शेख अनिस,मलखान चव्हाण,प्रजल चव्हाण, एस.ऐ.आळणे,लिपिक संजय चव्हाण,
टि.वि.वावरे,व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,व दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या