Advertisement

Responsive Advertisement

रायगड प्रेस क्लब संलग्न माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने प्रगतशील शेतकर्यांना शेताच्या बांधावर पुरस्कार


      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव तालुका प्रेस क्लबच्या माद्यमातुन २०२२ या वर्षीचे आदर्श शेतकरी पुरस्कार संबंधित प्रगतशील शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी माणगाव तालुक्यातील भुवन ग्रामपंचायती मधील मु.विठ्ठल नगर या गावचे प्रगतशील शेतकरी चिंतामणी रावजी यादव तसेच दुसरा आदर्श शेतकरी पुरस्कार इंदापूर विभागाच्या मुठवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मुक्काम उमरोळी दिवाळी येथील    दुसरे प्रगतशील शेतकरी भोळीनाथ बाबू साळवी यांना माणगाव तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.      
      यावेळी रायगड जिल्ह्यातील नामवंत उद्योजक तसेच माणगांव तालुका प्रेस क्लबचे कायदेशीर सल्लागार डॉ.संजयजी सोनावणे साहेब,भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच दिशाताई जाधव,रायगड प्रेस क्लबचे सहचिटणीस पदमाकर उभारे, माणगांव तालुका अध्यक्ष संतोष सुतार,कार्यध्यक्ष गौतम जाधव,खजिनदार सचिन वनारसे,लोकशाहीर ,लोक कवी,रायगड भुषण गोंविद शिंदे, माजी. सरपंच विलास शिंदे,अकुश उडरे, माजी.उप सरपंच नितिन शिर्के, सदस्य भास्कर यादव,राम येलकर तसेच विठ्ठल नगरचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच  इंदापुर विभागाच्या निवी मुठवळी ग्रामपंचायती मधील मु.उमरोली दिवाळी या गावातील प्रगतशील शेतकरी भोळीनाथ बाबु साळवी यांना प्रेस क्लबच्या माध्यमातून आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करताना युवा क्रांती संघ (रंजि) डेव्हलपमेंट सेटरचे अध्यक्ष संदेश सोनावणे, तसेच संकल्पना संस्थापक सुनील कदम,नितिन साळवी तसेच साळवी परिवार या वेळी  उपस्थित होता. यावेळी यादव आणि सालवी या दोन्ही परिवारांने रायगड प्रेस क्लब तसेच माणगांव तालुका प्रेस क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा करुन माणगाव तालुका प्रेस क्लबचे मनापासून अभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या