Advertisement

Responsive Advertisement

किसान मजदूर सभेचा जमीन हक्क व शेतकरी हक्कासाठी मोर्चा...

धर्माबाद-भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. एकीकडे जगभरात भारतीय लोकशाही व्यवस्थेचा जयजयकार होत असला तर दुसरीकडे देशातच दलीत-आदिवासी-भटके विमुक्त जमाती, अल्पसंख्यांक समाज
शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय हक्कापासून वंचित आहेत. तर देशाचा शेतकरी संपूर्णपणे कर्जबाजारी झाला असून युवकांतील बेरोजगारीचा स्तर उंचावला आहे. याचा अनुशेष भरून काढण्यासाठी शेतमजुरांना कायम रोजगार उपलब्ध करून देणे,शेती दुरुस्ती, फळबाग लागवड संगोपन यासाठी रोजगार हमी योजना कार्यान्वित करून ग्रामीण कष्टकऱ्यांना बारमाही रोजगार उपलब्ध करून देणे यासारख्या मागण्या अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 
     यामध्ये प्रत्येक गावात मजूर सहकारी संस्था स्थापन करणे व बोगस संस्था बंद करणे,सहकारी बँक व निमसहकारी बँका, फायनान्स व वित्त संस्था मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे,शेतमजुरांना 300 दिवसाचा कायम रोजगार पुरवठा करावा, अल्पभूधारक शेतकरी,भूमिहीन शेतमजुरांना, विनाशर्त दरमहा पंधरा हजार रुपये पेन्शन मंजूर करावे, विहीर, गावतळे, पाझर तलावाचे काम मनरेगा अंतर्गत करावे, भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येकी ३ एकर जमीन वाटप करणे, आदिवासींसाठी ६ वी सूची लागू करा,  आदिवासींसाठी जंगल अधिकार लागू करा व अंमलबजावणी करा, अंगणवाडी ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे मोफत व सक्तीचे शिक्षण द्यावे, नागरिकत्व सुधारणा कायदा, सीएए, एनआरसी, एनपीआर रद्द करावे,नांदेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व अभ्यासिका, ग्रंथालय व संशोधन केंद्र स्थापन करावे,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य स्मारक व अभ्यासिका आणि ग्रंथालय व संशोधन केंद्र स्थापन करावे,नांदेड येथे उर्दू विद्यापीठ व महाविद्यालय स्थापन करणे अशा अनेक मागण्या संदर्भात अखिल भारतीय किसान मजदुर सभेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. सदरील मोर्चा शहरातील मुख्य रस्त्याने उपजिल्हाधिकरी कार्यालय पर्यंत काढण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या