Advertisement

Responsive Advertisement

धानोरा खु येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड उद्घाटन सोहळा संपन्न...

धर्माबाद:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा खुर्द केंद्र चिकना ता धर्माबाद या शाळेला जिल्हा परिषद नांदेड कडून मानव विकास योजने अंतर्गत एक 64 इंची भव्य स्मार्ट टीव्ही ,3 बॅटऱ्या, साउंडबॉक्स प्राप्त झाले .
दिनांक 18 जुलै 2022 रोजी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री रविशंकर मरकंटे यांच्या हस्ते या डिजिटल स्मार्ट टीव्ही चे उद्घाटन झाले.
या प्रसंगी करखेली बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री शिवकुमार पाटील, संकुल चिकना चे केंद्रप्रमुख श्री संजय कदम,केंद्रीय पदोन्नत मुख्याध्यापक श्री जयवंत हंगरगेकर,माजी मु अ श्री अनमोड सर, शालेय व्य. समिती अध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई अम्रतराव,श्री गोवर्धन माधवराव पा.नरवाडे , श्री गणेश केरबा शिलगिरे ,श्री चांदूजी वाघमारे सरपंच धानोरा खु श्री राजेश्वर गंगाधर दाणेकर उपसरपंच धानोरा खु,श्री उत्तमराव दत्तराम पा.नरवाडे माजी उपसरपंच ,
श्री दत्तात्रय तोटावर माजी पंचायत समिती सदस्य,
श्री श्यामराव लिंगोजी बिंगेवार सेवानिवृत्त कृषिअधिकारी , श्री संतोष सदाशिव पा. मोरे ,सौ. आरती उन्हाळे ग्रामसेविका,
श्री हणमंतराव नागोराव पा नरवाडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, किशनराव महादु मुपडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री हानमंतराव सोपानराव पा. नरवाडे ,श्री गिरिधर पांडुरंग पा नरवाडे,श्री शिवानंद महादू मुपडे,श्री प्रकाश किशन नरवाडे, श्री शिवनंद मोहन दाणेकर, श्री विनायक गंगाधर सुवर्णकार,श्री
पोशट्टी कोणाजी कोटुरकर शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चरलेवार व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी शिवकुमार पाटील यांनी धानोरा खु च्या शिक्षणप्रेमी पालकांचे नेहमीच शाळेच्या विकासासाठी अनमोल अशी मदत राहिलेली आहे असे उद्गार काढले. माननीय गटशिक्षणाधिकारी श्री रविशंकर मरकंटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या