Advertisement

Responsive Advertisement

बामणी फाटा येथील व्यापारी असोसिएशनची अजीत पवार यांच्या कडे पोलिस चौकी ची मागणी


हदगाव -(ता.प्र.विकास राठोड )   ता.31 महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजीत दादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे अतीवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी हदगाव तालुक्यात शनिवारी तिस रोजी करमोडी पिंपरखेड येथे आले असता त्यांना पळसा येथे ग्रामपंचायत कार्यालयाने,करमोडी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील स्वच्छतागृह पाणी गळक्या खोल्या चा पाडा वाचत  अडचणीचे लेखी निवेदन दिले,तर पिंपरखेड येथे संरपंच पिटु पाटील,तालंग येथील बंडु पाटील मिराशे यांनी आपल्या भागातील अडचणीचे निवेदन दिले.तर परीसरातील विविध ठिकाणच्या शिष्टमंडळाने  आपल्या भागातील अडचणी सोडविण्यासाठी लेखी निवेदन देऊन मागणी केली.
तर परीसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बामणी फाटा येथे जवळपास चे तिस गावातील व्यवहारासह   दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ये जा असते. येथील बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस स्टेशन मनाठा पंधरा किलोमीटर अंतरावर असुन पोलिस चौकी बरडशेवाळा नावालाच असल्याने मागील काही वर्षांपासून  चोरीचे प्रमाण वाढले असुन अनेक दुकाने फोडली असल्याची घटना घडल्या असल्याने दुकानातून घरी गेल्यानंतर उद्या सकाळी दुकानापर्यंत येईपर्यंत  काळजीच लागत असल्याने   सध्याची परीस्थिती लक्षात घेता बामणी फाटा येथे पोलिस चौकी देण्याची मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चव्हाण पाटील, व्यापारी प्रशांत हानवते बामणीचे उपसरपंच अक्षय पवार यांच्या सह व्यापारी बांधवांनी बामणी फाटा येथे अजीत दादा पवार पुढील भागात जात असताना   संबंधित विभागाकडे आमच्या भावना कळविण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या