Advertisement

Responsive Advertisement

शालेय समितीच्या अध्यक्षपदीहाजी बेगम आरिफ शाह तर उपाध्यक्षपदी आसिफ खान मजीदखां पठाण यांची एकमताने निवड...

सोयगाव : 
जि.प.उर्दू प्रा. शाळा फर्दापूर ता.सोयगाव येथे शुक्रवारी (ता.२९)  नुतन  शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
समिती ही वर्गनिहाय गठीत करण्यात आल्याची अधिकृत माहिती शालेय प्रशासनाने दिली आहे.
 
यात उर्दू माध्यमाच्या समिती गठीत वेळी इ.१ ते ५ वी चे विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. पालकांच्या सहमतीने  बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.यावेळी अध्यक्षपदी हाजी बेगम आरिफ शाह तर उपाध्यक्षपदी आसिफ खान मजीदखां पठाण , सदस्यपदी शेख जावेद  शेख पाशू, शेख औसाफ अहमद,अफसर खान हैदर खान, सगिराबी आरिफ खान, सना इरफान शाह आणि मिनाज आरिफ शेख  यांची निवड करण्यात आली. दरम्यान या प्रसंगी तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष शेख मुख्तार शेख मुंशी, पोलीस पाटील शिवाजी बाविस्कर पाटील , ग्रामपंचायत सदस्य फिरोजखां पठाण, शेख निसार  फर्दापुर केंद्राचे केंद्रप्रमुख  ए. एस. पोळ, जि.प .केंद्र प्राथमिक शाळा फर्दापुरचे मुख्याध्यापक  दुर्गादास बलांडे , उर्दू माध्यमचे शिक्षक शकील , आमेर,श्रीमती सूमेरा बेगम आदी सर्व पालक प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या