Advertisement

Responsive Advertisement

मराठा तेज च्या बातमीचा दणका....! वाघोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गटविकास अधिकाऱ्यांची भेट ,प्रशासनाने घेतली बातमीची दखल


फुलंब्री :-१८ फुलंब्री पंचायत समितीच्या च्या कार्यतत्पर गटविकास अधिकारी ज्योती कवड देवी मॅडम यांनी जिल्हा परिषद वाघोळा तालुका फुलंब्री शाळेला भेट दिली. व शाळेच्या दयनीय अवस्थेची पाहणी केली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत शाळेच्या इमारतीची व परिसराची पहाणी करीत ग्रामपंचायतला तात्काळ उपाय योजना म्हणून शाळेवरील पत्र्यावर ताडपत्री टाकण्याचे आदेश देऊन, शाळा दुरुस्ती व नवीन इमारत मागणी संबंधीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी विस्तार अधिकारी श्री जायभाय, सरपंच सौ पुष्पा अरुण गायकवाड, उपसरपंच गोविंद गायकवाड, भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील गायकवाड, श्रीमंत पाटील गायकवाड, कोंडीबा पाटील गायकवाड, दगडू पाटील गायकवाड, भगवान पाटील गायकवाड, पंढरीनाथ पाटील गायकवाड, नबाजी पाटील गायकवाड, रामेश्वर पाटील गायकवाड, बाबुराव पाटील गायकवाड, महादू जाधव,ग्रामपंचायत सदस्य भानुदास गायकवाड,कैलास नवतुरे, बाळू गायकवाड,  ग्रामसेवक श्री अमोल गायके, रोजगार सेवक आत्माराम पाटील गायकवाड, संगणक चालक सुनील लकडे, छायाचित्रकार सचिन गायकवाड, समाधान गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित होते. कार्यतत्पर गटविकास अधिकारी ज्योती कवड देवी यांचे गावच्या वतीने कार्य तत्परतेबद्दल विकास गायकवाड यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या