Advertisement

Responsive Advertisement

फेर तपासणीत दहावीच्या परीक्षेत पाच तालुक्यातून हर्षदा जाधव पहिली

धर्माबाद-गेल्या महिन्यात 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात कु.हर्षदाने प्रत्येक प्रश्न पत्रिका कसल्याही गैरमार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने सोडवलेल्या होत्या. त्यामुळे तिला किमान 99% गुण प्राप्त होतील हा दृढ विश्वास होता परंतू नियतीच्या मनात वेगळेच होते. का जाणे गणित ,विज्ञान सारख्या 100% गुणप्राप्तीची हमी असलेल्या दोन्ही विषयात हर्षदा चे 4 गुण परिक्षकाने कसे कापले ?हाच प्रश्न निकाल ऐकून हर्षदाच्या मनात घोळत होता. आणि याच शल्य मनात बोचत होत.
अलिकडे 10 वी इयत्तेच्या गुणांच मोल ही कमी झालेलं आहे. परंतू गुणवत्तेच मोल कोण करणार ? शेवटी उत्तर पत्रिका फेरतपासणीचा निर्णय घेतला. त्याचच फळ म्हणून लातूर बोर्डाने केलेल्या फेरतपासणीत हर्षदाचे गणित ,विज्ञान व मराठी या 3 विषयात प्रत्येकी दोन गुणांप्रमाणे एकूण  6 गुण वाढून ती 97.80%गुण मिळवून  जवळपासच्या 5 तालुक्यात अव्वल क्रमांकाने उतीर्ण झाली.
यात ब-याच मित्र मैत्रिणींचा सल्ला व सहकार्य कामी आले.
हा क्षण कु.हर्षदा आणि कुटुंबियांसाठी आनंदाचा ठरला.
बालपणापासूनच शांत, संयमी,सोज्वळ,निगर्वी,
हसतमुख असलेली हर्षदा शालेय जीवनात सर्वच आघाड्यांवर  नेहमीच अव्वल क्रमांकावर असायची.अगदी प्राथमिक इयत्तेत असताना अनेकदा ऑलम्पियाड सारख्या स्पर्धा परिक्षेत राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश प्राप्त केले.चित्रकला परिक्षेत ही मानांकीत पुरस्कार प्राप्त केले.
इयत्ता नववी मध्ये असताना कसल्याही शिकवणीचा आधार न घेता आपल्या कुशाग्रबुध्दीच्या जोरावर फक्त शाळेत गुरूजंनानी शिकवलेल्या अभ्यासाच्या ताकतीने माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली.   
फेरतपासणी नंतर वाढलेल्या 6 गुणांमुळे कु.हर्षदाने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळविला यापेक्षा तिला आत्मविश्वासाने केलेल्या फेरतपासणीत वाढलेल्या गुणांचे मुल्य पाहून डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.     
 17 जूनला दहावी इयत्तेचा निकाल जाहीर झाला तेव्हा सहलीवर असलेल्या हर्षदाला निकाल ऐकून रडू कोसळले. आई वडिलांनी फेरतपासणी करू म्हणत तिला धीर दिला.आजच्या फेर निकालाने कु.हर्षदाच्या त्याच अश्रूंची फुले झाली.
फेरतपासणीचा निर्णय कुणाशी स्पर्धा करण्यासाठी किंवा अव्वल क्रमांकाने उतीर्ण होण्यासाठी कधीच नव्हता फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठीच होता व माझ्या यशाचे श्रेय माझ्या विजडम शाळेतील मुख्याध्यापक,सर्वच शिक्षक ,कार्यालयीन कर्मचारी व आमच्या शाळेतील वाहन चालवणारे प्रत्येक वाहनचालक यांना मी अर्पित करते अशी प्रतिक्रिया कु. हर्षदाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या