Advertisement

Responsive Advertisement

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, आमदार राजेश पवार यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

 धर्माबाद- सतत आठ ते दहा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे नायगाव मतदारसंघासह धर्माबाद तालुक्यातली पिके उध्वस्त झाली. शेतातील सखल भागात एवढे पाणी साचले आहे आता दुबारा पेरणीचे संकट उभा टाकले असले तरी दुबारा पेरणी करताच येते की नाही अशी अवस्था येऊन बसली. शेतजमीन खरडून गेली, शेतातील माती वाहून गेली. अशा परिस्थितीत सदरील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिके मातीमोल झाले. त्यामुळे त्यांना सरसकट भरघोस मदत जाहीर करा अशी रास्त मागणी आमदार राजेश पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या