Advertisement

Responsive Advertisement

सेवानिवृत उपअभियंता साहेबराव जाधव यांचा गावकर्‍यांनी केला सत्कारहदगाव,(ता.प्र.विकास राठोड )     हदगाव तालुक्यातील मौजे वाळकी बाजार येथील असणारे साहेबराव  भागोजीराव जाधव वाळकीकर यांनी नांदेड मनपामध्ये उपअभियंता पदावर कार्यरत म्हणुन उत्कृष्ठ कार्य केले व त्यांची सेवा समाप्त झाली असल्याने वाळकीकरांनी सेवानिवृतीचा कार्यक्रम गावी व्हावी म्हणुन दिनांक १८/०७/२०२२ रोजी ग्राम पंचायत कार्यलय वाळकी बाजार येथे घेण्यात आला असुन यावेळी या कार्यक्रमास वाळकीचे भुमीपुत्र तसेच सेवानिवृत्त उपअभियंता साहेबराव जाधव यांचे चिरंजिव आळंदी नगरीचे मुख्यधिकारी आंकुशभाऊ साहेब जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.तसेच गावचे सरपंच प्रतिनिधी शिवाजी कदम,ग्राम पंचायत सदस्य परमेश्वर कदम,ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी पत्रकार धर्मराज गायकवाड,ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी बाळु पाटील,राजु पाटील (माळकरी) बाबुराव कदम,उल्हास कदम,आनिल कदम,कोंडबाराव कदम,रुक्माजी गायकवाड,रघुनाथ गायकवाड व गावातील आनेक नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.
        विशेष म्हणजे आळंदीचे मुख्यधिकारी आंकुश जाधव यांनी वडीला बद्दल भावना वैक्त करतांना सेवानिवृत उपअभियंता साहेबराव भागोजीराव जाधव माझे वडील यांनी अनेक वर्षापासून निष्ठापूर्वक सातत्याने आणि सचोटीने कामकाज करून नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे सेवा केले आहे.यांचा आदर्श कार्यरत कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे व गौरउद्गार व कृतज्ञता आळंदी येथे नगरपालिका पदावर कार्यरत असलेले मुख्याधिकारी अंकुश भाऊ साहेबराव जाधव वाळकीकर यांनी सेवानिवृत्ती वडिलांच्या कार्यक्रमांमध्ये आपल्या भावना व्यक्त केली आहे.
        हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार हे गाव अडीच हजार लोकसंख्या वस्तीची आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले मनपाचे उप अभियंता साहेबराव भागोजीराव जाधव यांनी अनेक  संकटांचा आणि अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत पंप ऑपरेटर ते उपअभियंता या पदा पर्यंत पन्नास वर्षाचा प्रदीर्घ संघर्षपूर्ण प्रवास आहे.त्यांना नांदेड मनपाच्या उपअभियंता पदावरून तीस वर्षाचा प्रदिर्ग सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत.
            साहेबरावजी जाधव जिवन प्रवास यांच्या जन्म ६ जून १९६४ रोजी वाळकी बाजार गावात झाला त्यांच्या जीवनातील प्रवास सर्वांनाच थक्क करणारा असून एस.एस.सी. १९८० बारावीच्या नंतर आयटीआय १९८३ ते १९८६ ते १९९० स्वतःचा ऑटो चालविला परिवारातील पत्नी,आई,दोन मुले, दोन मुली, पहिला मुलगा अंकुश साहेबराव जाधव हा आळंदी नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून कार्यरत तर दुसरा मुलगी डॉक्टर मनीषा परमेश्वर महामुरे तिसरी मुलगी ब्युटी पार्लर तर चौथा मुलगा शुभम साहेबराव जाधव गोरमेंट कॉन्ट्रॅक्टर बनवून यशस्वी रित्या जाधव कुटुंब व निरंकार तीस वर्षाची प्रदीर्घ सेवाकाळावधी पूर्ण करून वाळकी करांचे नाव उज्वल केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या