Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद किल्ला येथे पर्यटकांची मोठी गर्दी

दौलताबाद प्रतिनिधी - रविवारी  सुट्टी असल्याने   दौलताबाद किल्ला पर्यटकांची मोठी गर्दी    पाहायला मिळाली
 वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने दिल्ली दरवाजा येथे  एका वेळी एकच वाहन जाते पण काही वाहन चालक आपली वाहने पुढे घालतात यामुळे ट्रॅफिल जाम होते आज पण असेच झाले नेहमी छावणी वाहतूक पोलीस येथे तैनात असतात पण आज रविवार असून सुद्धा येथे कोणतेही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते यामुळे जाणारे येणारे प्रवासी च पोलीस बनून ट्रॅफिक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते 
वाहतूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मी लगेच कर्मचारी पाठवतो असे सांगितले
संध्याकाळी चार वाजेपासून ट्रॅफिक जाम सुरू होते दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगच राग लागली होती  वाहतूक ठप्प असल्याने अनेक प्रवासी पर्यटकांना त्रास सहन करावा लागला
दौलताबाद पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी कर्मचारी पाठवुन वाहतूक सुरळीत केली 
दौलताबाद किल्ला खुलताबाद,सुलीभजन, वेरूळ लेणी,म्हैसमाळ ,आदी ठिकाणी होशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दिसून आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या