Advertisement

Responsive Advertisement

वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ-सरपंच गजानन ढगे


सोयगाव -> ( विजय पगारे )

पर्यावरणाच  समतोल हा जर कायम राखायचा असेल तर  जंगल ही गरजेचं आहे.अलिकडच्या काळात जंगलाची निर्मिती श्यक्य नसली तरी वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन मात्र करने शक्य आहे.यातुन दुष्काळावर मात करणे शक्य होवू शकते, वृक्षारोपन हि काळाची गरज असुन आपल्याला शुद्ध हवा व आँक्सिजन या झाडामुळे मिळते त्या मुळे गावातील प्रत्येक कुंटुबातील एका सदस्याने आपल्या घरासमोर झाडे लावुन गाव हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आमखेडा या.सोयगाव ग्राम पंचायत सरपंच गजानन ढगे यांनी (ता.१८) सोमवारी केले.
ग्राम पंचायत आमखेडा परीसर, स्मशान भूमी,  एस.टी.महामंडळाचे सोयगाव आगार , महावितरण १३२ के.व्ही.कार्यालय , आमखेडा आरोग्य उपकेंद्र,  विविध ठिकाणी वृक्षा रोपण करण्यात आले.यावेळी सरपंच गजानन ढगे यांनी उपस्थितांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले,यावेळी विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले. ग्रामसेवक -सयनारायण.बी.पुल्लेवाड,लीपीक कडूबा ठाकरे  ,श्रीराम ढगे ,धर्मराज पाटील, संतोष काळे, योगेश वामने, संतोष सोहनी, दिनेश इंगळे एस. टी.महामंडळाचे व्यवस्थापक हिरालाल ठाकरे आदी सर्व कर्मचारी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या