Advertisement

Responsive Advertisement

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील घटना

सिल्लोड -   पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील शहराजवळील पाणी फिल्टर प्लांटजवळ घडली. दरम्यान भरदिवसा दुचाकीस्वाराला चिरडून चालक वाहन घेऊन पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच वांगी खु. गावावर शोककळा पसरली. 

   नितीन संजय बोरसे (२१ रा. वांगी खु.) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

     मयत तरुण स्कुटीवरुण क्रं. (एमएच- २४, एडी- २३५८) सिल्लोड शहराकडे येत होता. शहरालगत असलेल्या पाणी फिल्टर प्लांटजवळ मागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक देत चिरडले. नागरिकांनी धाव घेत ही माहिती शहर पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज, सुनील तळेकर, भिक्कन सतुके यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. अपघात होताच वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत नागरिकांकडे अज्ञात वाहनाची विचारपूस केली. मात्र काही सुगावा मिळाला नाही. पोलिसांनी भोकरदन, औरंगाबाद नाक्यावर जाऊन देखील पाहणी करीत विचारपूस केली. मात्र अज्ञात वाहनाचा तपास लागला नाही. दरम्यान पोलिसांकडून रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. 

       दरम्यान मयत तरुणाच्या पश्चात आई- वडील, भाऊ- बहिण असा परिवार आहे. त्याच्या मृतदेहावर रात्री आठ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या