Advertisement

Responsive Advertisement

पितळी भांडी झाली हद्दपार, पितळी भांड्याचा वापर देव्हाऱ्यापुरताच

सोयगाव प्रतिनिधी -विजय पगारे  
^^^^^^^^^^^^^^^^^^
 'जून ते सोन' असे म्हणतात ते जपून ठेवले जाते मग त्यामध्ये जुने सोन्यांचे अंलकार असो किंवा पितळी भांड्याच्या वस्तू पण सध्या हेच जुन पितळी सोन कवडीमोल भावाने विकले जात असुन एकेकाळी स्वयंपाक गृहाचा कणा असलेले तांब्या आणि पितळेची भांडी आज स्वयंपाक गृहातुनच नव्हे तर अगदी घरातून हद्दपार होत आहेत.
पितळाची जागा आता स्टीलने घेतली आहे टिकाऊ पेशा दिखाऊ पणाला महत्त्व आल्याने जुनी पितळी भांडी नामशेष होण्याच्या मार्गावर आली याच बरोबर पितळेच्या भांड्याची हि  ओळख देखील काळानुसार कालबाह्य होऊ लागली.
पारंपारीक अशा वस्तू फार कमी लोकांकडुनच जपल्या जात आहेत काही वेळा त्यांना उजाळाही दिला जातो सध्या बदलत्या काळानुसार स्टीलची भाडी मोठ्या प्रमाणात वापरत असताना दिसुन येत आहे
परंतु बदलत्या काळानुसार पितळी भांड्याची मागणी घटली  अन् स्टीलची मागणी वाढली त्यामुळे येणा-या पिढीला पितळेच्या भांड्याची ओळख राहते का नाही हा प्रश्न या निमीत्ताने उपस्थीत होत आहे.लग्नसमारंभातही हलक्या भांड्याचा वापर...

पितळाच्या भांड्याचे दर जास्त असल्याने त्यामुळे फारच कमी लोक पितळी भांडे खरेदी करतात लग्न संमारंभात आणलेली आहेर भांडी केवळ नावापुरती असतात तिचे वजन हि एकदम हलके असतात आगोदरच्या काळातील पितळी भांड्याच्या तुलनेत आता ही दहा भांडी बसतील एवढ्या हलक्या प्रतीची भांडी बनवली जात आहेत.
 '


काळाच्या ओघात हा जुना ठेवा असलेल्या पितळी ताट, तांबे, वाटी, चमचा, हंडा, कळशी, घागर, परात, बादली, आदी भांडी घरातुन अलिकडच्या काळात घरातुन कालबाह्य झाली आहेत. जुन्या परंपरेनुसार वापरात असलेल्या या भांड्याचे दरही जास्त असल्याने त्याचा परीणाम मागणी व खरेदी व्यवहारावर कमी झाला आहे त्यामुळे आजच्या काळात या भांड्यांना खरेदी मागणीकडे लोकांनी या दुर्लक्ष केले आहे आजच्या काळात नव्या पिढीला जुन्या काळातील भांडी जास्त न ठेवता ती मोडीत काढली जात आहेत अशा मोडीत निघालेल्या पितळी भांड्यांना आजही बाजारपेठेत जास्त प्रमाणात मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या