Advertisement

Responsive Advertisement

सर्व प्रशासकीय विभागांनी सांघिकपणे काम करीत विकास कामांना गती द्यावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 

मालेगावदि. 30

 : राज्य शासनाच्या  सर्व विभागांनी आपापल्या जिल्ह्यात सांघिकपणे कार्य करीत विकास कामांना गती द्यावीलोककल्याणकारी योजनांची प्रभावीणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावाअसे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुलात आज सकाळी नाशिक विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होतेया बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळखासदार  हेमंत गोडसे,  आमदार सर्वश्री दादाजी भुसेगुलाबराव पाटीलमौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल,  चिमणराव पाटील,  किशोर पाटील,  चंद्रकांत पाटीलबबनराव पाचपुते,  दिलीप बोरसे,  डॉराहुल आहेर,  नितीन पवार,  सुहास कांदेफारुक शाहआमदार श्रीमती मंजुळाताई गावितलताताई सोनवणेनाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी गंगाथरण डी. (नाशिक), नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बीजी. शेखर-पाटीलनाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (नाशिक), यांच्यासह विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीराज्य शासन जनतेप्रती संवेदनशील आहेत्यामुळेच थेट विभागस्तरावर जावून विकास कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतलात्यानुसार आज नाशिक विभागाचा  आढावा घेतला आहे.  सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेतया कालावधीत यंत्रणांनी अधिक सतर्क राहावेअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावापाणीपुरवठा आणि मल:निस्सारण योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेतत्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात येईलराष्ट्रीय महामार्गसार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्तेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेतजिल्ह्यातील दळणवळण सुयोग्य राहण्यासाठी रस्त्यांची परिस्थिती सुधारावीनागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेताना नवीन कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतीलयाचीही दक्षता घ्यावीत्यासाठी विभागीय आयुक्तांनी विभागाततर जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सनियंत्रण करावेआवश्यक तेथे मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करावीशासनस्तरावरुन मंजूरी आवश्यक असलेल्या बाबींचे परिपुर्ण प्रस्ताव शासनास सादर करावेतजिल्हा नियोजन समितीतून औषधे आणि जीवनाश्यक वस्तू खरेदीस परवानगी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहेत्यासाठी नेहमीच प्राधान्य राहीलत्याचाच एक भाग म्हणून  पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी तातडीने आवश्यक ते प्रस्ताव सादर करावेतजळगाव येथील केळी संशोधन प्रकल्पधुळे येथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरणनंदूरबार जिल्ह्यातील वीज वितरण उपकेंद्रनाशिक जिल्ह्यातील नारपारगिरणा योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास राज्य शासनाच्या स्तरावरून सकारात्मक निर्णय घेण्यात येईलतसेच अहमदनगर येथील संरक्षण दलाच्या जागेच्या भूसंपादबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

यावेळी खासदार हेमंत गोडसेआमदार किशोर  पाटीलआमदार दादाजी भुसेआमदार डॉराहुल आहेरआमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आपापल्या विभागातील अडी-अडचणी सांगत त्या सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केलीअहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉराजेंद्र भोसलेधुळयाचे जिल्हाधिकारी जलज शर्माजळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊतनंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आपापल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व त्याचबरोबर प्रलंबित प्रस्तावांची माहिती दिली.

 

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील पाऊसपेरणीधरणांमधील जलसाठाप्रधानमंत्री आवास योजनाआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी राबविण्यात आलेल्या उभारी’ योजनेची सविस्तर माहिती दिलीतापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंत्यांनी नारपारगिरणा योजनेची माहिती दिलीमहसूल उपायुक्त रमेश काळे यांनी सूत्रसंचालन केलेयावेळी नाशिकअहमदनगरजळगावधुळेनंदूरबार येथील विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या