Advertisement

Responsive Advertisement

वृक्ष लागवड फक्त कागदावरच , शिल्लक राहिले खड्डे... खड्डेच...

सोयगाव -> विजय पगारे

वनपरिक्षेत्र कार्यलय क्षेत्रात पर्यावरणाचा समतोल रहावा म्हणून वन विभागाच्या वतीने मोठा गाजावाजा करीत कोटी रुपयांचा प्रचंड खर्च करून जिल्ह्यात व अजिंठा पर्वत रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. 
परंतु लागवडीनंतर झाडांची निगा न घेतल्याने राखणे साठी गेल्या उन्हाळ्यात पाण्याअभावी न ही सर्व रोपे करपून गेली असून केवळ खड्डेच.. खड्डे...! शिल्लक राहिली आहेत. परिणामी शासनाचे कोटी रुपये निधी हा पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे...!
वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत विभात जिल्हाभरात जुलै २०१८ मध्ये शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र ही वृक्ष लागवड केवळ फोटोसेशन पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांत राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्ष लागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर या झाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे वृक्ष लागवड योजनेतील मोजकेच झाड जिवंत असल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला गेल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसे हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीयार्ने लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या