Advertisement

Responsive Advertisement

पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये चौवीस तासात गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिस ठाण्यात पत्रकारांचे भरपावसात ठीय्या ...सोयगाव -
सोमवारी (ता.१८)अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या सोयगाव तालुका पदाधिकाऱ्यांनी भरपावसात पोलिस ठाण्याला घेराव घातल तक्रारी अर्ज देत, रविवारी ता.१७ बातमीदार फिर्यादी ईश्वर इंगळे यास आरोपी अमोल हीरे यांनी माझ्या बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ढप्परगाडीचा एम.एच.४०ए.के.१५७३ चे फोटो व व्हिडिओ का काढला म्हणून अशील शिवराळ करीत जबर मारहाण केल्या प्रकरणी आंदोलन करुन आरोपी विरुद्ध पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .
यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे,भरत पगारे, संदिप इंगळे, दत्तात्रय काटोले, मुस्ताक शहा, कृष्णा पाटील, रविंद्र काटोले, संतोष गर्दे, विजय पगारे, शेख सुलेमान, विजय काळे, आदी ३० पदाधिकाऱ्यांचे सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदारे यांनी तक्रारी निवेदन स्वीकारुन पत्रकारांच्या शिष्ठमंडळास पत्रकार स्वरक्षण कायद्यान्वये गुन्हा ऍड करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून बघीतल्या जातील.कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई नक्कीच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान महसूल विभागाचे सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांना प्रत्यक्ष भेटून संघटनेच्या वतीने स्वतंत्र तक्रार
 सादर करुन सोयगाव शहर परिसरात ठीकठाकानी वाळू पट्टे नसतांनाही बेकायदेशीर शासनाच्या डोळ्यात अंजन टाकुन शहजारो ब्रास वाळू साठे साठवून करुन अव्वाच्या सव्वा चढ्या भावाने विक्री केली जात आहे.यांचेकडे परवाना नसुनही.वाळू तस्कर यातून लाखों रुपयांची उलाढाल करीत असलल्याने महसुल विभागातीत शरद पाटील स्व : ताहाचे चांगभलं करुन घेत या बेकायदेशीर गोरख धंद्यावाल्यांचे ग्वाडफादर झाल्याने दिवसा ढवळ्या बिनबोभाट व्यवसाय फोफावला अयल्याचे उघडं झाले.परीसरातील सर्व महसुली बुडवून केलेले वाळू साठे पंचनामा करून ते महसुल विभागाने ताब्यात घ्यावेत असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.तहसीलदार रमेश जसवंत यांनी वाळू तस्करांवर कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वाळू माफिया विरुद्ध कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार आहे.याची सर्वस्व जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहील असा गंभीर इशारा ही तक्रारी निवेदनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व पोलीस महासंचालक मुंबई,विशेष पोलीस महासंचालक,विभागीय पोलीस मुख्यलय औरंगाबाद, पोलीस अधिक्षक ग्रामीण औरंगाबाद. उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना तक्रार अर्ज देण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या