Advertisement

Responsive Advertisement

शिवसेना पक्षावरील संकट टळू देशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे दक्षिणमुखी मारुती कडे प्रार्थना


छत्रपती संभाजीनगर, दि. १९ (प्रतिनिधी) - राज्यात बंडखोर गद्दार आमदार व खासदार यांनी शिवसेनेशी दगाबाजी केली आहे.
यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धैर्याने व संयमाने या संकटाला सामोरे जात आहे. लवकरच शिवसेना पक्षावरील संकट टळू दे, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे दक्षिणमुखी मारुतीकडे प्रार्थना केली.
दौलताबाद येथील प्रसिद्ध दक्षिणमुखी व नवगृह मंदिरात महायज्ञाचे आयोजन केले होते. ११ ब्रह्मवृदांच्या उपस्थितीमध्ये वेदशास्त्र संपन्न कुष्णाकांत मुळे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली हे नियोजन सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळ आणि संसदेत शिवसेनेच्या बाजूने निकाल लागतील असा विश्वास यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या