Advertisement

Responsive Advertisement

वसमतयेथे शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिराचे आयोजनवसमत - मयूर मंगल कार्यालय येथे आम तनदार राजुभैया नवघरे यांच्या संकल्पनेतुन व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई व जिल्हा केंद्र हिंगोली यांच्या व सेवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून गुडघेदुखी, कंबरदुखी, तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये अत्यंत तज्ञ व नामांकित डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य तो उपचार केला. गोळ्या, औषधे व आवश्यक असणाऱ्या रुग्णांचे x-ray, MRI, CT Scan व इतर तपासण्या करण्यात आल्या. 
अत्यंत तज्ञ, अनुभवी व प्रसिद्ध असणाऱ्या डॉ.अबी.तुराब शब्बीर चुनिया साहेब यांनी या शिबिरामध्ये अनेक रुग्णांची तपासणी करून रुग्णांचे रोगनिदान केले. ज्यांना पुढील शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची नोंदणी करण्यात आली आहे आणि लवकरच त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 
ज्यांना कुणाला फिजिओथेरपीची आवश्यकता होती त्यांच्यासाठी फिजिओथेरपीची एक मोठी टीम या शिरामध्ये उपस्थित होती. अनेक रुग्णांना फिजिओथेरपीच्या माध्यमातून थेरपी व पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला.
आज या शिबिराचा ३ रा दिवस व शेवटचा सोमवार दिवस होता. एकूण २२०० च्यावर रुग्णांची तपासणी झाली असून ७०० X-ray काढण्यात आले आहेत तसेच १५० रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी नोंदल्या गेले आहेत. 
या तीन दिवसांच्या शिबिरामध्ये एकूण तपासण्या ४१००४ व एकूण X-ray १३०० व एकुण शस्त्रक्रिया करण्यासाठी २८० रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. 

या शिबिरासाठी बहुमूल्य वेळ देणाऱ्या सर्व विभागाच्या डॉक्टरांचे मनस्वी धन्यवाद ! व्यक्त करण्यात आले.तसेच या शिबिराला यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व सेवा प्रतिष्ठाणच्या सर्व सेवा दूतांचेही मनस्वी आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या