Advertisement

Responsive Advertisement

खरीप पिकांचा विमाशेतक-यांनी उतरवावा- जिल्हाध‍िकारी सुनील चव्हाण


औरंगाबाद, दि. 26 :  लहरी हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास  विम्यामुळे  शेतकऱ्यास आर्थिक मदत होते. त्यामुळे 31 जुलैच्या आत सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा आजच उतरवावा, असे आवाहन जिल्हाध‍िकारी सुनील चव्हाण यांनी केले.
 जिल्हाध‍िकारी कार्यालयाच्या परिसरात कृषी चित्ररथांना जिल्हाध‍िकारी चव्हाण यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.  खरीप पिकांच्या विमा उतरवण्याबाबत कृषी विभाग आण‍ि एआयसी कंपनीकडून तीन चित्ररथांच्या माध्यमातून जिल्हाभरात जागृती करण्यात येत आहे. 
पीक विमा उतरविला आण‍ि लहरी हवामान, मोठ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीनंतर 72 तासाच्या आत विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक (1800 4195 004), https://pmfby.gov.in/ यावर कल्पना देणे आवश्यक आहे. पीक विम्याच्याबाबतीत अध‍िक माहिती हवी असल्यास नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही चव्हाण म्हणाले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक बी.एम.जोशी, कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रितम कांबळे आदी उपस्थ‍ित होते. 
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या