Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव पोलीस स्टेशनचे तात्कालीन सपोनि.सुदाम शिरसाट सह पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित , पोलीस कर्मचारी सरताडे,बरडे,यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान..


सोयगाव / प्रतिनिधी

सोयगाव पोलीस स्टेशनचे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट,पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित,पो.ना.ज्ञानेश्वर सरताळे,पो.ना.राजू बरडे,यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरवपत्र प्रदान करण्यात आला हा पुरस्कार औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोयगाव पोलीस स्टेशन येथील गुरन.८१/२२ कलम-४५४,३८०, या गुन्ह्याचा तपास तात्कालीन सपोनि. सुदाम शिरसाट,पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित,ज्ञानेश्वर सरताळे,राजू बरडे,यांनी तपास करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपी यांना अटक करून १०.७५०,ग्राम सोने,व २००००₹ रोख, हस्तगत केला.या घटनेचा तपास बारकाईने तपास करून सदर आरोपीस न्यायालयात हजर केले होते.या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण मनीष कलवानिया यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.तसेच भविष्यातही अशाच उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.तसेच सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार सर सह सर्व पोलीस कर्मचारी स्टॉप यांनी त्यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

सोबत फोटो:-४ पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या