Advertisement

Responsive Advertisement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोळा ची दयनीय अवस्था


 

फुलंब्री दि.१४ तालुक्यातील वाघोळा येथील जिल्हा परिषद शाळेतील ऑफिस सह सर्व वर्ग खोल्यांची पावसाचे पाणी गळाल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या गुरे - ढोरे बांधण्याच्या गोठ्याची ही एवढी दयनीय अवस्था नसते, एवढी दयनीय अवस्था चिमुकले शिकत असलेल्या या प्राथमिक शाळेची झाल्याचे शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी भेट देण्यासाठी गेलो असता या दरम्यान या गोष्टी लक्षात आल्याचे गावकरी विकास पा. गायकवाड, श्रीमंत पा.गायकवाड, कोंडीबा पा.गायकवाड, मनोहर पा. गायकवाड, बाबुराव पा. गायकवाड, यांनी म्हटले आहे. गावाची भावी पिढीची  शिक्षणासाठीची ही दुरावस्था दूर करण्यासाठी फक्त शासनाच्या, सरकारच्या, ग्रामपंचायतच्या भरवशावर न बसता तातडीची उपाययोजना म्हणून गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिकांनी, गावकऱ्यांनी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती अध्यक्ष,शालेय समितीचे सर्व सदस्य, यांनी पुढे येत प्राथमिक दुरुस्ती म्हणून शाळेवरील पत्र्यावर गाव वर्गणीतून तप्पड खरेदी करून ते वर्गावर अंथरल्यास किमान पावसाळ्याचे चार महिने विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्याचा होणारा त्रास दूर होईल आपल्या घरातील कोणी शाळेत असो किंवा नसो, सर्व राजकीय मंडळींनी राजकीय जोडी शाळेच्या बाहेर काढून, शाळेत शिकणारी सर्व मुले आपलीच आहेत शाळा गावची आहे म्हणून सर्व गावकऱ्यांनी तप्पड खरेदी व फिटिंग साठी पुढे येत पुढाकार घेत सर्वांनी आर्थिक मदत करावी.असे मत विकास पा. गायकवाड, श्रीमंत पा.गायकवाड, कोंडीबा पा.गायकवाड, मनोहर पा. गायकवाड, बाबुराव पा. गायकवाड, यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या