Advertisement

Responsive Advertisement

सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत.....दोन निर्वाचक गण नागरीकांचा मागासप्रवर्ग साठी राखीव होण्याची शक्यता?

  सोयगाव :-> विजय पगारे
---------------------------------
सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी गुरुवारी ता.२८ पंचायत समितीच्या सभागृहात विशेष भूसाम्पंदन अधिकारी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.त्यामुळे सोयगावात राजकीय वातावरण तापले आहे.

    सोयगाव पंचायत समितीच्या आमखेडा,फर्दापूर,सावळदबारा,बनोटी, निंबायती,आणि गोंदेगाव या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे.त्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार रमेश जसवंत,नायब तहसीलदार हेमंत तायडे,विठ्ठल जाधव,आदी सोडतीची प्रक्रिया राबविणार आहे.सोयगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी कोणताही बदल झालेला नसून सोयगाव शहर वगळता जिल्हा परिषदेचे तीन गट,व सहा गणांसाठी सोयगाव तालुक्यात निवडणुका होवू घातल्या आहे.यासाठी गुरुवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या