Advertisement

Responsive Advertisement

सालेगाव ते नेमटेक रस्त्यावरील पूल उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल

धर्माबाद- तालुक्यातील सालेगाव ते उमरी तालुक्यातील निमटेक गावाला जोडणारा नाल्यावरील पूल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतीकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
सदरील पुल व रस्ता हा जिल्हा परिषद अंतर्गत होता अशी माहिती मिळत असून आता हा पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मान्यता मिळाली असून आमदार राजेश पवार यांच्या परिश्रमातून सदरील रस्ता दुरुस्त होणार असला तरी या पुलाचे मात्र या रस्त्याच्या कृती आराखड्यात दुरुस्ती संदर्भात कुठलाच उल्लेख नसल्याचेही धक्कादायक वृत्तआहे.
धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथील शेतकऱ्यांची जवळपास 50 ते 60 टक्के शेती ही पुलाच्या पलीकडे निमटेक गावच्या दिशेने आहे. तत्वतच सालेगाव वासियांना उमरी तालुका हे बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून जवळ पडतो. पण सदरील पुल पुन्हा उध्वस्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतात जरी तारेवरची कसरत करत गेले पण सतत पडत असलेल्या पावसामुळे सदरील नाल्याला कधी पूर येईल आणि त्या उद्ध्वस्त झाल्याच्या पुलावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे जीवितास कधी धोका उत्पन्न होईल अशी अनामिक भीती सदरील दोन्ही गावात आहे.
गेल्या वर्षीच आमदार राजेश पवार यांनी सदर रस्त्याची पाहणी करून या पुलाच्या संदर्भात सदरील वरिष्ठ कार्यालयाशी बोलून सदरील पुलाच्या दुरुस्ती संदर्भात चर्चा केली. पण संबंधित कार्यालयाने हा पुल मजबूत असल्याचे सांगितले. पण यावर्षी संततधारेमध्ये हा पूल उध्वस्त झाला असून सदरील पुल उंची वाढवून दुरुस्त करण्याची मागणी किंवा नवीन पूल करण्याची मागणी सालेगाव व निमटेक यातून होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या