Advertisement

Responsive Advertisement

पुन्हा लाल काळा जुगार सुरु , सर्वसामान्यांची पुंजी लुटताहेत जुगार चालक

पनवेल प्रतिनिधी :- कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत कळंबोली सर्कल येथे पुन्हा लाल काळा जुगार सुरु , सर्वसामान्यांची पुंजी लुटताहेत जुगार चालक 

 क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन ची रास्त मागणी.
कोरोनामुळे गेले दोन वर्ष अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून अनेकांना आपल्या घरे , गाड्या , दुकाने तसेच सोने नाणे विकावे लागले आहे, तसेच अनेकांवर कर्ज देखील होऊन ते मानसिक तणावाखाली जगत आहे . त्यातच आता लोकांचे संसार उघड्यावर पाडण्यासाठी व लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल काळा जुगार चालकांनी आपले बस्तान मांडले आहे . कळंबोली स्टील मार्केट व कळंबोली सर्कल तसेच देवांश इन हॉटेलसमोर लाल काळा जुगार चालकांनी आपले बस्तान बसवले आहे. मात्र या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे . नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे बंद केले होते, त्याचप्रमाणे कळंबोली येथे कडक व शिस्तप्रिय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड पदभार स्वीकारताच दारूबंदी, अवैध धंदे बंद केले होते,  व लाल काळा जुगार चालवण्याऱ्यांवर करडी नजर ठेवली होती . मात्र पुन्हा काही महिन्यानंतर सतीश गायकवाड यांची बदली झाल्यानंतर पुन्हा लाल काळा हा अवैध धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने चालू झाला असल्याचे पाहायला मिळते. ज्याठिकाणी अवैध धंदे बंध आहेत, त्याठिकाणी अवैध धंदे सुरु होतात कसे ? हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत पोलिसांना काही पत्रकार, समाजसेवक यांनी याबाबत कळण्याचा प्रयत्न केला किंवा सत्य छापले तर त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पत्रकारांवर कसे खोटे गुन्हे दाखल करता येतील याचीच वाट बघत असतात, मात्र अश्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे .तसेच  नवी मुंबई आयुक्तालय, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री आदितताई तटकरे यांस  या ठिकाणी मेलद्वारे मेल करून क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशच्या अश्याक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांनी  पत्राद्वारे  केली आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या