Advertisement

Responsive Advertisement

संबोधी विहार गोरेगाव- माणगाव येथे वर्षावास मालिकेचा प्रारंभ मोठ्या उपस्थितीसह उत्साहात संपन्न


       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) पंचशील  बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग महिला सेवा संघ व बौद्धजन पंचायत समिती  गोरेगाव शाखा क्रमांक ८४१ च्या  विद्यमाने  संबोधी विहार गोरेगाव येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेचे पाहिले पुष्प आयुष्यमती सुजाता अनिल जाधव यांनी गुंफले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विकासदादा गायकवाड यांनी भूषविले. वर्षावास मालिकेची सुरुवात गुरू पौर्णिमा दिवशी कुडे मांदाड येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी येथून करण्यात आली. याचे नेतृत्व आयु. चंद्रमणी साळवी, अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती व सुप्रिया साळवी, अध्यक्ष पंचशील महिला संघ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन आयु. संदीप साळवी यांनी केले.
       प्रवचन मालिकेचे पाहिले पुष्प केंद्रीय शिक्षिका सुजाता अनिल जाधव यांनी गुंफले.  त्यांनी भगवान गौतम बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावर मंत्रमुग्ध प्रवचन देऊन बौद्ध धम्म सांगितला. या कार्यक्रमाला १०० महिला उपस्थित होत्या.  
  यावेळी महिला संघटक संघमित्रा गायकवाड, सुवर्णा हाटे,चापडी, उषा हाटे, नागाव, रेश्मा साळवी व योजना लोखंडे, खांडपाले, विजया गायकवाड, राजेश्री साळवी, योजना शिंदे, रेश्मा साळवी उपस्थित होत्या. 
   यावेळी आयु. दिलीप साळवी , सिद्धार्थ शिंदे, शैलेंद्र साळवी, निलेश साळवी, हिरामण महाडीक, अनिल जाधव, गणेश जाधव, विजय जाधव, श्रीकांत साळवी, लोखंडे अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर वर्षावास सोहळा तीन महिने सुरू राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या