Advertisement

Responsive Advertisement

धानोरा ग्रामस्थांचे प्रचंड हाल; ड्रेनेजच्या कामामुळे तुडवावा लागतोय चिखलकाँन्ट्रॕक्टरची मनमानी; ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष


सिल्लोड(प्रतिनिधी)ः धानोरा (ता. सिल्लोड) येथे  ड्रेनेज लाईनच्या कामामुळे  गावातील रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. ऐन पावसाळ्यात नियोजनशून्य पद्धतीने हे काम करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागत असल्याने आबालवृद्धांचे मोठे हाल होत आहे. 

ग्रामपंचायतीने भर पावळ्यात गावात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम  सुरु केले. यासाठी संबंधित काँट्रॕक्टरने रस्ता  खोदला. कामानंतर व्यवस्थित चारी बुजवणे आवश्यक होते. मात्र तसे न करता थातूरमातूर काम केले. दोन्ही बाजूने माती तशीच ठेवली, त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने लावून धरल्याने मातीत पावसाचे पाणी साचून सर्व रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चिखल तुडवतच ग्रामस्थांना आपली कामे करावी लागत असून लहान मुले, वृद्धांची दमछाक सुरू आहे. याच मुख्य रस्त्यावर खासगी दवाखाना, औषधीचे दुकान आहे. त्यामुळे चिखलमय रस्त्याचा रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शेती कामासाठी जाणारे शेतकरी-शेतमजूर,शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. 
ड्रेनेज लाईनचे काम करतांना काँट्र्ँक्टरचा नियोजनशून्य कारभार त्रासाचे कारण बनल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. एवढे होऊनही ग्रामपंचायतीला कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

रोगराई पसरण्याचा धोका....
 संपूर्ण रस्ता चिखलमय बनल्याने  गावात  रोगराई पसरण्याचा धोका आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने डासांची उत्पती होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. याबाबत काँट्रॕक्टरशी  संपर्क साधला असता त्याने या कामा संदर्भात विषय काढताच या विषयावर बोलणे टाळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या