Advertisement

Responsive Advertisement

आर.जी.एस. च्या विद्यार्थ्यांची आषाढी निमित्त वारकरी दिंडी


हदगाव - हदगाव शहरातील हदगाव तालुक्यातील नावाजलेले व  नामांकित असलेल्या आर.जी.एस. स्कूल व कनिष्ठ  महाविद्यालयमध्ये आषाढी एकादशी निमित्त अभूतपूर्व अशी माऊलीची दिंडी काढण्यात आली.
     गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे शाळा बंद होत्या. या शैक्षणिक वर्षापासून शासनाने शाळा नियमित केल्यानंतर आषाढी हा पहिलाच उत्सव आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशभूषेत तुळशवृंदावन   डोक्यावर घेऊन माऊलीची पालखी खांद्यावर घेत भगव्या रंगाची पताका फडकवत टाळामृदंगाच्या गजरात वाद्यांचा वापर करून  पुंडलिका वरदे हरी विठ्ठल... च्या जयघोषेत  हदगाव नागरी दुमदुमून गेली होती. गावातील प्रमुख मार्गाने प्रदक्षिणा करून ही दिंडी विठ्ठल पिसाळ यांच्या विठ्ठल - रुखमाई मंदिरा जवळ विसर्जित करण्यात आली. या दिंडीतील चुमुकल्यानी केलेली वेशभूषा व गायलेले वारकरी गित पाहता जणू अवघे पंढरपूर हदगाव येथेच अवतरल्याचे उपस्थितांतून बोलल्या जात होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताई, विठ्ठल-रखुमाई, वारकरी यांचे पोशाख परिधान केले तर मुली चोळी खणाचा पोशाख करून छोटी तुळस घेवून शाळेमध्ये येऊन दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन
करण्यात आले. दरम्यान विठू नामाच्या गजरात, गाण्यावर ठेका धरत विद्यार्थी तल्लीन झाले होते. 
     यावेळी विठ्ठलाच्या भूमिकेतील अशितोष बोइनवाड व रुखामाईच्या भूमिकेत वैष्णवी शर्मा यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांचे ठीक - ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका सौ. वंदना संदीप भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अर्जुन सोमगरी, यांच्यासह शिक्षक सर्वश्री सचिन शिरगारे, पवन पवार, भगवान इंगोले, राजेश कलाने, देवराव कोल्हे, रोहित करपे, हर्षिता जोशी, रेवती बोनगुला, शालू वाच्चेवार, आयशा चाऊस, मिनाज चाऊस, ऋतुजा तुपेकर, काजल जोशी, प्रतीक्षा चिंचोलकर, प्रियंका पऊळ, वैष्णवी पेंटेवाड, भाग्यश्री डुकरे, अंजली अलट, सरिता माळोदे, वैष्णवी तंत्रे, सविता हटकर, अर्चना चांदने यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. *चौकट घेणे* अपंग मतिमंद विध्यार्थ्यांसोबत सहभाग आर.जि.एस. शाळेच्या प्रशासनाने सामाजीक बांधिलकी जपत तामसा रोड वरील अपंग,मतिमंद व मुकबदीर विध्यार्थ्यांसोबत दिंडित सहभाग नोंदवुन त्यांचा उत्साह वाढविला यावेळी मतीमंद शाळेचे सर्व शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते.यापुर्वीही आर.जि.एस.ने याच ठिकाणी रक्षा बंधन साजरा करत खाऊ चे वाटप केले होते. आर.जि.एस.चे संचालक संदिप भाऊ भुरे सरांचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या