Advertisement

Responsive Advertisement

जिंतूर पंचायत समिती इमारतीमध्ये ‘ठिंबक सिंचन’, पाच महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
            
मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चक्क जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. जिंतूर पंचायत समितीचे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हे कार्यालय 'ठिंबक सिंचन' प्रमाणे गळायला लागल्याने कार्यालयातील कर्मचारी 'ओलेचिंब' होत असल्याने कार्यालय सोडून बाहेर जात आहेत. तर दुरुस्ती चे काम करणारे गुत्तेदार-अधिकारी मात्र आपले हात ओले करून बसले आहेत.
          चार महिन्यांपूर्वी दुरुस्त करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. शासकीय कामकाजाचे दस्तावेज भिजू नये, यासाठी कापडाच्या साह्याने कपाट व इतर साहित्य झाकून ठेवावे लागत
या विभागात एकाही कर्मचाऱ्याला बसता येत नाही. परिणामी, या विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. राजकीय गुत्तेदारांना काम दिल्यामुळेच मागील पाच वर्षांपासूनच्या दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जिंतूर पंचायत समितीची सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. यावेळी थातूरमातूर काम करताना निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केल्यामुळे पंचायत समितीच्या सर्व कार्यालयाची दस्तऐवज भिजत असून, संपूर्ण पंचायत समितीची इमारत गळत आहे. विशेष म्हणजे जिंतूर पंचायत समितीच्या दुरुस्तीचे काम सातत्याने केले जाते. राजकीय कार्यकर्त्यांना हे काम दिले जात असल्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे लक्ष नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे. पंचायत समितीचे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी आता ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे. मात्र नागरिकांच्या या मागणीकडे पंचायत समिती प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. दुरुस्तीवर होणारा लाखोंचा खर्च वाया जातो.


 सभापती, उपसभापतींच्या
दालनात कामकाज

पंचायत समितीमध्ये पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, आस्थापना एक, आस्थापना दोन, घरकुल विभागाला गळती लागल्याने चक्क सभापतीच्या केबिनमध्ये घरकुल विभागाचे कर्मचारी बसत असून, उपसभापतीच्या केबिनमध्ये आस्थापना एक व आस्थापना दोन विभागांचे कर्मचारी कामकाज करीत आहेत. त्यामुळे पंचायत समितीची अवस्था बिकट झाल्याचे पाहावयास मिळते. याबाबत आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या