Advertisement

Responsive Advertisement

धर्माबादेत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा...


 धर्माबाद:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब  यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीचे माजी सभापती मारोती पाटील कागेरु व शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कन्या शाळेतील १४  निराधार विद्यार्थ्यांना वार्षिक शालेय साहित्य देत ६ वह्या, पेन, कंपास, चित्रकला बुक,कलर, दप्तर अशी शालेय कीट तयार करून वाटप करण्यात आले. व इतर ११५ विद्यार्थ्यांना २वह्या पेन इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांना बाराखडी खाऊ असे वाटप करणा-यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळेला शैक्षणिक उठाव व लोकवर्गणी मधून शाळेचा कायापालट करण्यासाठी दानशूर व्यक्तींना शालेय व्यवस्थापन समिती च्या वतीने आव्हान करण्यात आले होते. तरी त्यामुळे पंचायत समिती सभापती मारोती पाटील कागेरु यांच्या वतीने शाळेच्या संरक्षण जाळीचे ५० पुटं लांबी चे दोन बिंड्डल देण्याचे जाहीर केले.शिवसेनेच्या बिद्रवाक्य आहे की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या नुसार याआधी पण तालुका शाखा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळेला पाण्याची टाकी डिजिटल वर्गासाठी प्रोजेक्टर ही देण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष  म्हणून जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रकाश जी मारावार नांदेड हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव विधानसभा संघटक शिवराज भाऊ मोकलीकर, पंचायत समिती सभापती मारुती पाटील सागर तालुका संघटक गणेश गिरी, माजी शहरप्रमुख राजु शिरामणे,  विद्यार्थी माजी शहरप्रमुख बालाजी बनसोडे, मनुरकर, गौराजी पाटील, मारोती पाटील ईळेगावकर, नितीन सरोदे ,पत्रकार महेश जोशी, युवा पत्रकार समिती चे उपाध्यक्ष रज्जाक सर , शिवराज पाटील गाडीवान, किरण गजभारे, शेख जमाल,लालाजी इमनेलु, पांडुरंग पांचाळ , शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जगदंबे पाटील सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते, यावेळी शाळेतील शिक्षक माधव हिंमगिरे, शेख सर , जोशी मॅडम सय्यद चंदा मॅडम बेहेरे मॅडम सह शिक्षक विद्यार्थी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मुख्याध्यापक श्री ना.सा. येवतीकर यांनी केले तर आभार शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी सदस्य भगवान कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या