Advertisement

Responsive Advertisement

वेताळवाडीचा पुरातन किल्ला् हिरवाळीने बहरला...पर्यटकांना ैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी गर्दी


सोयगाव : विजय पगारे
सोयगावसह परिसरात १५ ते वीस दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे जंगलाला सोंदर्य बहरले असून मात्र नागमोडी वळणाच्या रस्त्यावर असलेला वेताळवाडीचा किल्ला मात्र दाट हिरवळीत हरविला असल्याचे चित्र आहे.

वेताळवाडीच्या परिसरावर हिरवा शालू नटला असल्याने या किल्ल्याच्या वाटा हिरवळीत हरविल्या असल्याचे चित्र आहे.

    शहरापासून जवळच ५ कि.मि.अंतरावर असलेला पर्यटनासाठी महत्वाचा समजल्या जाणाऱ्या किल्ल्यातील वेताळवाडी हा एकमेव किल्ला आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे हा किल्ला धुक्यात आणि हिरवळीत हरविला असल्याने सध्या हा किल्ला श्रावणाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे.या किल्ल्याचे सोंदर्य म्हणजे नागमोडी वळणाचा रस्ता आणि या रस्त्यावरून सुरु असलेली एकेरी वाहतूक यामुळे या किल्ल्याने सध्या कोकणाचे रूप धारण आलेले आहे.वाढत्या हिरवलीमुळे किल्ल्याचे सोन्दर्यात बहर आलेला दिसुन येत असुन शनिवारी आणि रविवारी दोन दिवस हा किल्ला धुक्यांमध्ये हरविल्याचे चित्र होतं किल्ल्यावरून दिसणारी खोल दरी आणि त्यातच दरीच्या कवेत असलेले वेताळवाडी धरण हे या किल्ल्याचे सोंदर्य वाढविणारे ठिकाणे आहेत.त्यामुळे वेताळवाडीचा किल्ला श्रावण महिन्याच्या आधीच पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.विशेष म्हणजे या हिरवळीच्या डोंगरात असलेल्या विविध पर्णफुलांनी रंग धारण केले आहे. त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक रंगांचा मोठा आधार मिळाला आहे या नैसर्गिक रंगांनी वेताळवाडीचे पर्यटन  म्हणजे कोकणातील पर्यटन ठरत आहे.

---------सोयगाव शहरापासून जवळच असलेला हा वेताळवाडीचा किल्ला या किल्ल्याच्या तटबंदी आणि किल्ल्यावरील तोफ हे पर्यटनाचे आकर्षण बनले असून नैसर्गिक हिरवळीत वेताळवाडीच्या पर्यटनाचा आनंद अवश्य घेण्यासारखा असल्याचे मत काही पर्यटकांनी व्यक्त केले आहे.

---------श्रावणा आधीच वाढली गर्दी---

 सोयगाव-हळदा-सिल्लोड या नजीकच्या मार्गावर गलवाडा गावाच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला आहे.उंचावर असलेल्या किल्ल्याला हिरवळीने झाकले असल्याने या किल्ल्यावर श्रावणाच्या आठवडाभर आधीच सोन्दार्याची झालर पसरली आहे.या किल्ल्याच्या जवळूनच सिल्लोड-औरंगाबाद कडे जाणारा नागमोडी रस्ता या रस्त्यावरून प्रवास करतांना जणूकाही कोकणच्या काही भागातूनच प्रवास करत असल्याचे जाणवते त्यामुळे सिल्लोड केव्हा येईल याचे भानही राहत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या