Advertisement

Responsive Advertisement

कवाना येथील दुर्लक्षित तलावासह अतिवृष्टी भागाची अधिका-यांनी केली पाहणी


 हदगाव (ता.प्र.विकास राठोड) हदगाव तालुक्यातील सर्व परीसरात झालेल्या अतीवृष्टीने   पेरणी केलेल्या पिकांसह शेती खरडून गेली आहे.  गावातही मातीचे अनेक घरांची पडझड झाली आहे.तर पिंपरखेड बरडशेवाळा महसूल मंडळातील कवाना गावालगत असलेला तलाव पाण्याने भरुन  ओव्हर फ्लो झाला असल्याने व  ओढ्यावर असलेल्या अनेक लघु पाटबंधारे विभागाचे बंधा-यांच्या बाजुने  फुटुन पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन अंनतवार यांनी तहसीलदार जिवराज डापकर यांच्या कडे नुकसानीची पाहणी करण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. शुक्रवारी पंधरा रोजी सायंकाळी   उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तहसीलदार जिवराज डापकर गट विकास अधिकारी मयुर अद्देलवाड यांनी कवाना येथील बंधारे असलेल्या ओढ्याजवळचा परीसरात अतीवृष्टीची  पाहणी करून कवाना येथील वरच्या भागात असलेल्या जलसंधारण विभागांच्या माध्यमातून केलेल्या तलावात भेट दिली.यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी   तलाव निर्मिती नंतर या तलावावरील गाळासह झाडी झुडप काढण्यासाठी संबंधित विभागाने केलेल्या दुर्लक्षाचा अधिका-याकडे  पाडा वाचवत यावर्षी केलेल्या  मनाठा उंचाडा डोंगरगाव येथील तलावाप्रमाणे कवाना येथील गाळ व झुडपे काढण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  
यावेळी  मंडळ अधिकारी कृषी पर्यवेक्षक संगेवार यांच्या सह कवाना येथील आजी माजी सरपंच उपसरपंच शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या