Advertisement

Responsive Advertisement

दौलताबाद येथे चक्री उपोषण करण्याचा निर्णय मागे

दौलताबाद -येथिल  ऐतिहासिक मोमबत्ता तलाव जवळ  जिल्हापरिषद अंतर्गत असलेली कँटीन ग्रामपंचायतीने शहरातील व्यावसायिकाला भाडे पट्यावर दिल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत भाडे पट्टा रद्दबातल करे पर्यत चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता 
झालेले करार रविवारी(17)ग्रामपंचायतीने रद्द केला या नंतर ग्रामस्थानि उपोषण मागे घेतले.

ऐतिहासिक मोमबत्ता तलावात बोटींग प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे,
त्या योजने अंतर्गत कँटीन बांधकाम करण्यात आले आहे.
ती कँटीन ग्रामपंचायत मार्फत भाडे तत्वावर शहरातील व्यापाऱ्याला देण्यात आली होती. ती शहरातील व्यावसायिकाला न देता  गावातीलच व्यक्तीला चालवण्यासाठी भाडे तत्वावर द्यावी या मागणी साठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाची सांगता सरपंच उपसरपंच यांनी ठरावा द्वारे भाडे करारनामा रद्द केल्याच्या ठरावा नंतर ग्रामस्थांनी रविवारी उपोषण मागे घेतले.


 या तलावात बोटिंग प्रकल्प मंजूर झालेला आहे जवळपास सात वर्षे झाली परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, यात टिकिट घर,अल्पोपहार गृह,शौचालय, बोटिंग करिता जीना व रस्ता तयार होऊन दोनं वर्षे झाली परंतु दुर्लक्षित असल्याने उदघाटना आधी याची मोडतोड झाली होती. एक कोटी पंचवीस लक्ष रुपयाच्या या प्रकल्पाची किंमत होती. एवढे होऊनही हा प्रकल्प आज घडीला अपूर्ण आहे,

  बोटिंग प्रकल्प सुविधा सुरु केल्यास ग्रामपंचायतला उत्त्पन्न मिळू शकेल व स्थानीक युवकांना रोजगार उपलब्ध होउ शकेल असे हा प्रकल्प सुरू करताना ग्रामस्थांना अश्वसन देण्यात आले होते,परंतु बाहेरील व्यक्तीला कँटीन चालवण्यास दिल्या नंतर ग्रामस्थांनी उठाव केला व चक्री उपोषणास सुरुवात केली होती.
यात प्रामुख्याने सय्यद मतीन, सय्यद खलील, सय्यद नइम, माजी सरपंच सय्यद हारुन,माजी उपसरपंच सय्यद शेरू,मुन्नी बाजी उपसरपंच, शेख लाला,शेख मिनाज
उपोषण मागे घेतल्यानंतर उपोषण कर्ते यांना माजी सरपंच सय्यद जीलानी,संजय कांजुने यांनी पाणी पाजले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या