Advertisement

Responsive Advertisement

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न


धर्माबाद:-विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणार्‍या युवा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम सतत राबवू असे आश्वासन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेशजी पवार यांनी नांदेड हॉटेल ताज पाटील येथील विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरात दिले.
समाजसेवेचे प्रेरणास्थान, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव मतदारसंघातील युवा विद्यार्थ्यांसाठी 22 जुलै रोजी नांदेड येथे हॉटेल ताज पाटील मध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या वेळी आ.राजेशजी पवार बोलत होते. 
प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ महेश पाटील व प्रवेश प्रक्रिया ज्येष्ठ मार्गदर्शक संजय सारडा हे या शिबिराचे प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचे सार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत नक्कीच होईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुद्रवाड सरांनी केले, प्रास्ताविक कोठाळे सरांनी तर आभार प्रदर्शन श्रीहरी निरंगलकर यांनी केले.
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत जिद्दीने आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तत्पर युवा पिढीला मतदारसंघाचा आमदार-पालक या भूमिकेतून मा. राजेशजी पवार आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनमताई राजेशजी पवार यांनी हे शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराला ध्येयवादी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या