Advertisement

Responsive Advertisement

पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


मालेगावदि. 30

 :

 

कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईलअशी ग्वाही आज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयमालेगाव कॅम्प पोलीस ठाणे व 205 पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालात्यावेळी ते बोलत होतेयावेळी आमदार  दादा भुसेआमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेमहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी,  नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलपोलीस अधीक्षक सचिन पाटीलनाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीसांच्या प्रश्नांच्या बाबतीत  हे सरकार संवेदनशील आहेपोलीसांच्या घरांच्या बाबतीत मुंबईत बैठक घेण्यात आली आहेयेत्या काळात शासनाच्या सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून पोलिसांच्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येईलमुंबई पोलिसांसाठी 50 हजार घरांची गरज आहेमात्र सध्या 19 हजार घरे उपलब्ध आहेतसद्यस्थितीतील घरांच्या डागडुजी व  देखभालीची नितांत आवश्यकता आहेत्या दृष्टीने शासन काम करत आहे.

 

सध्याचे सरकार हे सर्वसामान्य शेतकरीकष्टकरी यांचे सरकार आहेअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेराज्यातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे काम शंभर टक्के झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन युद्ध पातळीवर काम करत आहेलवकरच शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणार आहेसरकार  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.  अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वास्त केले.

 

 

 

 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहेपेट्रोल-डिझेल वरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहेमराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहेसरकारचा संकल्प लोकहिताचे कामे करण्याचा आहेलोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आमदार दादा भुसे म्हणाले की,  मालेगाव येथील पोलिसांसाठीचे 54 कोटी 49 लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले‌ आहे‌‌उर्वरित अधिकारी -कर्मचारी यांच्यासाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीततसेच पोलीस शिपाई भरती करावी.

 

यावेळी 5 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना प्रातिनिधीक स्वरूपात निवासस्थानाच्या किल्ल्या देण्यात आल्यामहाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितमुंबई यांच्याकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहेयावेळी मालेगाव पोलिसांच्या ताफ्यातील नवीन चारचाकी वाहनांचे लोकार्पण हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेया कार्यक्रमानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (ता.मालेगावयेथील कृषी विज्ञान संकुलाचे ( 169.24 कोटीभूमिपूजन व कोनशीला अनावरण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या