Advertisement

Responsive Advertisement

सततच्या जड वाहतुकीने रस्ताची दुर्वस्था झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर अडवले


सिल्लोड -सततच्या जड वाहतुकीने रस्ताची दुर्वस्था झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर अडवून धरले. ऐवढेच नव्हे तर ही माहिती थेट फोनवरुण जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील के-हाळा येथील दारुंटेवस्ती येथे घडली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी धाव घेत पंचनामा केला व टिप्पर जप्त केले. दरम्यान टिप्पर मालकांकडे रॉयल्टी पावती अचूक असल्याने टिप्पर सोडून देण्यात आले, अशी माहिती संजीव मोरे यांनी दिली. 

     पूर्णा नदीतून वाळू उपसा करीत टिप्परने वाहतूक केली जात असल्याने दारुंटेवस्ती रस्ताची दुर्वस्था झाली असून पावसामुळे पायी चालने अवघड झाले आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर क्रं. (एमएच- २०, ईजी- ८८६४),  क्रं. (एमएच- २०, बीटी- ३७६९) अडवून धरत चालक जमीर रईस शेख, अलीम शब्बीर पठाण यांना धारेवर धरले. या दरम्यान ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी घटनास्थळी पाठवले. त्यांनी पंचनामा करीत टिप्पर जप्त केले.

       दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागाकडून या संधर्भात खातरजमा केल्यानंतर टिप्पर मालकाकडे असलेल्या रॉयल्टी पावत्या अचूक असल्याचे समोर आल्याने भवन गावाजवळच जप्त करुण नेत असलेले टिप्पर सोडून देण्यात आले, अशी माहिती संजीव मोरे यांनी दिली. 

     वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने वाळू तस्करांची मुजोरी चांगलीच वाढली आहे. बुधवारी एक शेतकरी दारुंटेवस्तीवरुण बैलगाडीत शाळेत मुलांना सोडून परत येत होते. या दरम्यान समोरुन टिप्पर आले. रस्ता अरुंद असल्याने टिप्पर बाजुला घेण्याचे शेतकऱ्याने सांगितले. चालकाने न ऐकल्याने बैलगाडी एका बाजुने पुढे काढताना खड्यात गेली व शेतकरी खाली पडले. यामुळे वाद झाला व वस्तीवरील संतप्त शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी टिप्पर अडवुन धरले. दरम्यान वाळू भरण्यासाठी चक्क जेसीपीचा वापर केला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले.

एक हजार ब्रास वाळू साठा जप्त

      टिप्पर पकडल्याच्या अर्धा किलो मीटर अंतरावरील पूर्णा नदीच्या शेजरील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करुण ठेवण्यात आलेला आहे. तब्बल एक हजार ब्रास वाळूचा साठा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या साठ्याचा पंचनाम करुण उपविभागीय अधिकारी यांनी जप्त केला आहे. या संधर्भात नोटीस बजावुन माहिती मागवण्यात येणार आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती संजीव मोरे यांनी दिली. 

उपविभागीय अधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरने प्रवास

     घटनास्थळावरुण वाळूच्या साठ्यापर्यंत जाण्यासाठी चालून जाण्यासाठीही धड रस्ताही नव्हता. यामुळे स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, नायब तहसीलदार, तलाठी यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून वाळू साठा निदर्शनास आणून दिला. या निमित्ताने का होईना ट्रॅक्टर प्रवसानंतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दारुंटेवस्तीवरील शेतकऱ्यांच्या यातना निदर्शनास आल्या हे मात्र नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या