Advertisement

Responsive Advertisement

ग्राहकांवर पुन्हा वाढणार वीजबिलाचा बोजा, ‘या’ कारणामुळे दरवाढ अटळ…


सोयगाव -विजय पगारे
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

ग्राहकांवर पुन्हा वाढणार वीजबिलाचा बोजा, ‘या’ कारणामुळे दरवाढ अटळ महागाईने हैराण झालेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांना आता पुन्हा एकदा दरवाढीचा ‘शाॅक’ बसण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांत वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची टंचाई जाणवत आहे.. देशातील वीज प्रकल्पांजवळील घरगुती खाणींतून येणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.. त्यात माॅन्सूनच्या पावसामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार आहे.कोळसा आयातीचा भार ग्राहकांवर दुसरीकडे विजेची मागणी वाढल्यानेे ७६    दशलक्ष टन कोळसा आयात केला जाणार आहे.. त्यात सरकारी कंपनी ‘कोल इंडिया लिमिटेड’ (सीआयएल) तब्बल १५  दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. तसेच, ‘एनटीपीसी’ आणि ‘दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन’ (डीव्हीसी) सुमारे २३ दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे.इतर सरकारी व खासगी वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्याही ३८ दशलक्ष टन कोळसा आयात करू शकतात. देशात असा एकूण सुमारे ७६ दशलक्ष टन कोळसा आयात केला जाणार आहे.. जागतिक बाजारातील किंमतीनुसार हा कोळसा आयात केला जाणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीचा खर्च वाढणार असून, त्याचा परिणाम साहजिकच तुमच्या वीजबिलावर होणार आहे..वीज निर्मितीचा वाढलेला खर्च कंपन्या ग्राहकांकडूनच वसूल करतील.. त्यामुळे ग्राहकांवर वीजबिलाचा बोजा वाढणार आहे. पुढील काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात ५० ते ८० पैशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.सागरी बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे, यावर प्रति युनिट दरवाढ अवलंबून असेल. बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याचा खर्चही वाढणार असून, कंपन्या हा सगळा खर्च सामान्यांकडून वसूल करणार, हे नक्कीच..!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या