Advertisement

Responsive Advertisement

जिल्हा परिषद माळेगाव शाळेत मोफत शालेय साहित्य वह्यांचे वाटप


सोयगाव -> विजय पगारेे
सोयगाव तालुक्यातील माळेगाव येथिल जिल्हा परिषद शाळेत  सर्व विद्यार्थ्यांना  जैन महिला मंडळ पहुर ता.जामनेर जि.जळगाव यांच्या मार्फत विद्यमाने विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, गणित, विषयांचे २०० पेजेस असलेल्या वह्यांचे संच देण्यात आले. डॉ. महाजन एन. पी. डब्ल्यू. जरंडी यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले, 
या वह्यांचे वाटप गावाचे प्रथम नागरिक ग्रा‌ ‌‌‌‌‌पं. सरपंच दादाभाऊ जाधव, केंद्रप्रमुख जी.आर. पाटील ग्रामसेवक प्रफुल्ल गोरे,  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील, मुख्याध्यापक  प्रताप साळुंखे,  शिवराम जाधव, विक्रम जाधव, मंगलदास अहिरे, देवानंद जाधव, अनिल जाधव, गौतम सोनवणे, चेतन विसपुते, प्रवीण पाटील, महिला विमलबाई सोनवणे, सय्युबाई तांबे यांच्या हस्ते करण्यात आले,  तर शिक्षक नरेंद्र बारी यांनी उपस्थित मान्यवरांचे मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या