Advertisement

Responsive Advertisement

मोजणीत जमीन गेल्याचा राग धरून शेतात दिरानेच केला भावजयीचा खुन

                          हदगाव- हदगाव तालुक्यातील मौजे  पळसा ता.हदगाव येथील शेतकरी महिला ललीताबाई वंसतराव उमरकर वय ४८  अठरा मे रोजी सकाळी शेतातील कामासाठी गेलेल्या ललीताबाई सायंकाळपर्यंत घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता शेतालगतच असलेल्या कालव्यामध्ये मृतदेह आढळला.घटनेची माहिती मिळताच  मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व उपनिरीक्षक चिट्टेवार  उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळ गाठुन वरिष्ठांच्या आदेशानुसार नांदेड येथे शवविच्छेदन केल्याने त्यामध्ये खून झाला असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार मनाठा पोलीसांनी आपली तपास यंत्रणा सुरू केली.घटनेच्या रात्री झालेल्या पावसाने श्वान पथकाचा पहिला प्रयत्न फसला.तर घटना भरदिवसा शेतातील मोकळ्या जागेत घडली असल्याने पोलिसांना तपास करणे आव्हान ठरले होते.त्यामध्ये पोलीसांनी  अनेक जणांची चौकशी केली असता त्यामध्ये काही दिवसांपूर्वी जमीनीवरुन वाद निर्माण झाला होता. भुमि अभीलेखाच्या माध्यमातून शेत मोजणी केली असता मयत ललीताबाई यांची दिड एकर जमीन चुलत दिर  रामकृष्ण उमरकर मारोती उमरकर यांच्या कडे निघाली होती. तर घटनेच्या दिवशी  ललीताबाई यांनी दिराच्या शेतातील  आखाड्यावर बसुन बैल जोडी सौदा झाला होता. त्यामध्ये पोलीसांनी ललीताबाई यांच्या विषयी सर्व माहिती घेतली असता  रामकृष्ण भिमराव उमरकर वय ५० व मारोती अर्जुन उमरकर वय ४७  यांच्या वर दाट संशय आला असल्याने त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांचे घटनेशी संबंधित मोबाईल लोकेशन व तपासात उलटसुलट उत्तर मिळत असल्याने सात जुलै रोजी रामकृष्ण उमरकर यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले.तर दोन दिवसांनी मारोती उमरकर यांना ताब्यात घेऊन दोघाची कसुन चौकशी करून आपली खाकी चा हिसका दाखवल्याने त्यामध्ये मारोती उमरकर यांनी मोजनीमध्ये जमीन गेल्याचा व बैलांचा सौदा या कारणांमुळे राग धरून चुलत भाऊजयी ललीताबाई यांना मिच मारुन भाऊ रामकृष्ण  यांच्या मदतीने जवळच्या कालव्यामध्ये मृतदेह टाकल्याचे कबुल केले. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण उपनिरीक्षक चिट्टेवार यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करून दोघांना न्यायालयात दाखल केले असता त्यांना तिन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेच्या अगोदर महिलांच्या दागीन्यामुळे घातपाताच्या काही घटना घडल्याचे प्रकार घडले असल्याने शेतातील कामे करणा-या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा  तपास व्हावा हे सर्वांसाठी  एक आव्हान होते.या तपासामुळे मनाठा पोलीस कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाविषयी  समाधान केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या