Advertisement

Responsive Advertisement

ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तरुणींच्या साहाय्याने राबविण्यात येते आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यात तरुणींनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दौलताबाद येथील दौलताबाद किल्ला व परिसरात तरुणींनी स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. या मोहिमेचे कौतुक करत जिल्हाधिकारी यांनी आजपासून गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, असेही सांगितले. दौलताबाद किल्ला परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार विजय चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे, पोलीस उपनिरीक्षक गोवर्धन चव्हाण, मंडळ अधिकारी बी.आर.गुसिंगे, तलाठी एस.एम.मुळे, प्रियंका जगताप, मिलिंद साठे,  पुरातत्त्व विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहनकर, एस. एस. नीळ, मोहमद एजाज, आर. डी. घाटे, सीताराम धनायत, आसाराम काळे, फकिरचंद गायकवाड, बाबासाहेब आढाव, गिर्यारोहक योगेश्वरी बोहरे आदींसह तरुणींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
 *अंतूर किल्ल्याची उद्या स्वच्छता*
कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्या (ता.17) रोजी सकाळी 8 वाजता  तरुणींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या