Advertisement

Responsive Advertisement

घरात घुसून डॉक्टर महिल्लेवर जीवघेणा हल्ला- पोलिसांचा धाक ना दरारा; नागरिकांत भीतीचे वातावरण

ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 

            शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या घरात भरदिवसा घुसून दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक आज (दि 25) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे. परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गणेश नगर भागात डॉ.गणेश सांगळे हे आपल्या कुटुंबासह राहतात घटनेच्या वेळी डॉ. ज्योती सांगळे या कपडे धुत असताना अचानक घरामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी तोंडाला कापड बांधून घरात प्रवेश केला यावेळी डॉ.ज्योती सांगळे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून गळ्याला चाकू रोखला अशातच घरात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुलाजवळ हल्लेखोर जाताच हल्लेखोर व डॉक्टर यांच्यात झटापट सुरु झाली यामध्ये ज्योती सांगळे यांच्या बोटाला व गळ्यावर जबर दुखापत झाली आहे. दरम्यान आरडाओरडा झाल्यामुळे दोन्ही हल्लेखोर त्या ठिकाणावरून पळून गेले यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते मात्र पोलिसांनी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवली तेंव्हा एका संशयित आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टर महिलेवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळाले आले आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारीला किती वचक आहे, याची कल्पना येते. घटनेमागचे कारण चोरी की आणखी काही हे पुढील पोलीस तपासात सिद्ध होईल.

पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कारभार हाती घेऊन तीन महिने उलटल्यानंतरही शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरात आणखी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची ओळख होण्यासाठी नेमके पोलिसांना किती दिवस लागतील आणि शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कधी आळा बसेल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या