Advertisement

Responsive Advertisement

खासदार इम्तियाज जलील याचिकेची गंभीर दखल; शासनाने आरोग्य विभागाचे रिक्त पदे भरतीची प्रसिध्द केली जाहिरात


 
 
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या वेळोवेळी झालेल्या सुनावणी अंती मा.उच्च न्यायालयाने राज्य शासनाला आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि त्या संदर्भातील भरती प्रक्रियाबाबत तपशिलावर माहितीसह प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश दिले होते; त्याअनुषंगाने आज महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातील ४२७ पदे परिक्षेव्दारे भरती करीता विहीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामामार्फत मागितला आहे.
          राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये जनहित याचिका क्र. ४७/२०२१ दाखल केली होती. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील हे स्वत: व्यक्तिश: न्यायालयात त्यांची बाजु मांडून युक्तिवाद करत आहे.  
          मा.उच्च न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय रिक्त पदांमुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे कशा प्रकारे हाल होत असल्याचे निदर्शनास आणुन दिले होते. तसेच राज्यात वैद्यकीय रिक्त पदांची इत्यंभुत माहिती सुध्दा मा.न्यायालयात सादर केली होती. मा.उच्च न्यायालयाने सदरील प्रकरणाची गंभीरतेने दखल घेवुन शासनाला रिक्त पदे भरती संदर्भात कालबध्द कार्यक्रम सादर करुन विविध आरोग्य विभागात विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते.  
          महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातील ४२७ रिक्त पदे भरती करीता दिनांक २२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिध्द करुन त्यामध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशीलावार माहिती दिली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबत सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in अथवा https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
          जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी, शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे अर्ज सादर करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या