Advertisement

Responsive Advertisement

पती कडून पत्नीवर विळयाने वार, पत्नीची प्रकृती गंभीर पती पोलीसांच्या ताब्यात


ज्ञानेश्वर रोकडे/जिंतूर 
           तालुक्यातील चारठाणा येथे पती-पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीवर विळयाने सपासप वार केल्याने पत्नी गंभीर जखमी झाली असुन प्रकृती गंभीर बनल्याने सदर महिलेस उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे सदर घटना शुक्रवार १५ सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीसांनी सदर महिलेचा पती नारायण गवारे यास ताब्यात घेतले आहे.
 चारठाणा येथील नारायण गवारे व त्याची पत्नी अनुसया गवारे या दोघा मध्ये गुरूवार १४ रोजी रात्री  कडक्याचे भांडण झाले होते त्या अनुशंगाने सदर महिला शुक्रवार दि.१५  रोजी सकाळी सहाच्या सुमारास घराबाहेर पडली दरम्यान पतीस सदर महिला तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याचा संशय आल्याने पतीने पत्नीस पेठ भागातील मेन रोडवर गाठून त्याच्यावर  विळयाने सपासप  वार केल्याने अनुसया गवारे वय ४२  वर्ष  ही  महिला जमीनीवर कोसळली दरम्यान मदत करण्यासाठी धाव घेणार्‍या नागरीकांना सदर महिलेच्या पतीने हे माझे वैयक्तिक प्रकरण आहे तसेच विळयाचे   धाक दाखवल्याने कोणीच मधात पडले नाही.  घटनास्थळी पैकी  कोणीतरी पोलीसांना या बाबत माहिती  दिल्याने पोलीस घटनास्थळावर पोहचले व हस्तक्षेप करुन सदर महिलेच्या पतीस ताब्यात घेतले तसेच सदर महिलेस उपचारासाठी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात  येथे हलविले परंतु सदर महिलेची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला परभणी शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु परभणी येथून त्याला नांदेडला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान साहयक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विनोद साने , पोहेका सिध्दार्थ आचार्य, पोलीस नाईक अजय रसकटला, शिवदास सुर्यवंशी,  पो.काॅ. पवन राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

 *महिलेच्या  जवाबसाठी पोलीस पथक नांदेडला*  महिलेचा जवाब नोंदविण्यासाठी चारठाणा पोलीसांचे एक पथक शुक्रवारी  नांदेडला रवाना झाले असुन जवाब नंतरच  भांडणाचे  कारण समजणार असुन त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल होईल असे साहयक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी सांगितले.

    *पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून  पाहणी* 
सदर घटनेची माहिती जिंतूर पोलीस उपविभागीय अधिकारी गोफणे यांना मिळाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या