Advertisement

Responsive Advertisement

गुरूजी घेईणात हमी.. विद्यार्थी झाले कमी...जिल्हा परिषदेच्या शाळा अडचणीत : गुणवत्ता टिकविण्यासाठी गरज...

सोयगाव/ विजय पगारे
 ~~~~~~~~~~~

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाल्याने सर्वत्र शाळा गजबजू लागल्या आहेत.मात्र सध्या पालकांतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल अपेक्षा वाढू लागल्याने अपेक्षापूर्ण करण्याची हमी शिक्षक घेत नसल्याच्या  कारणाने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटू लागली असून काही शाळा बंद पडण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे.
        विज्ञान तंत्रज्ञानामुळे मुलांच्यामध्ये हुशारी वाढली आहे.इंग्रजी विषयाचे ज्ञान तर अत्यंत गरजेचे झाले आहे.काही  शिक्षक तर कुणालाही जुमानत नाहीत त्यामुळे गुणवत्ता खालावू  लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे.हा मुद्दा डोळ्यासमोर ठेऊन पालक आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी शाळांची शोधाशोध करीत आहेत.दुसरीकडे गोरगरीबाला हक्काचे शिक्षण देणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल शासन पुरते उदासिन असल्याची स्थिती दिसत आहे.गळक्या वर्गखोल्या तसेच पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक अपुरे असल्याने शिक्षकाविना वर्ग मोकळे राहू लागले आहेत.त्यामुळे ज्ञानार्जनाची भूक असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे.
        जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही शिक्षक तळमळीने वेगवेगळे उपक्रम राबवत असून जादा वेळ देऊन गुणवत्ता टिकविण्यासाठी धडपड करीत आहेत.मात्र काही कामचुकार शिक्षक हजेरी भरण्यापूरते उपस्थिती दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत.त्यामुळे कामचुकार शिक्षकांच्या ढिसाळ कामामुळे वरील वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना देखील लिहता वाचता येत नसल्याची लाजिरवाणी वास्तव स्थिती आहे.या कारणाने खासगी शाळांची संख्या दिवसेनदिवस वाढत चालली असून सधनशील पालक खासगी शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश  निश्चित करून उच्च दर्जाचे शिक्षण देणे पसंद करू लागला आहे.तर दुसरीकडे सरकारी शाळेतील अधिकार्‍यांनी कित्येक वर्ष शाळांना भेटी दिल्या नसल्यामुळे शिक्षकांना अधिकार्‍यांची भितीच राहिली नसल्याचे चित्र असल्याने  शिक्षकांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक शिक्षक दररोज वेगवेगळी कारणे सांगून शाळेमध्ये आयो — जाओ प्रमाणे मनमानी करीत असल्याने  शिक्षक पालक वाद नित्याचा झाला आहे.दररोजची कटकट नको म्हणून पालक खासगी शाळेची वाट पसंद करीत असले तरी शिक्षकांनी आपले भविष्य ओळखून अंगातील मरगळ वेळीच झटकून जोमाने काम न केल्यास तसेच शिक्षण विभागाने लक्ष न घातल्यास गोरगरीबांच्या मुलांना यापुढे हक्काचे शिक्षण घेणे अवघड होऊन बसणार आहे.

               
            गुरूजी तुमची मुलं कुठे आहेत..?
जिल्हा परिषदेच्या शाळेमधील पटसंख्या घटू लागल्याने वर्ग टिकविण्यासाठी  पालकांना गुणवत्तेची हमी देऊन विद्यार्थी पाठविण्यासाठी शिक्षक विनवण्या करीत आहेत.मात्र विनविण्या करणार्‍या शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचे समोर येऊ लागल्याने गुरूजी तुमची मुले कोणत्या शाळेत आहेत असा पालकांच्यातून प्रश्न उपस्थित होताचं विनवण्या करणारेच गुरूजी तोडघशी पडत असल्याची वास्तव स्थिती निर्माण होत आहे.
-------------------------------------------------
                : बाॅक्स :
* सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद मराठी शाळा एकुण = ९४
* सन २१-२२ जि.प शाळा इयत्ता १ ते १० वी मुले मुली एकूण संख्या पुढील प्रमाणे
मुल -५६९१, मुलगी -५६०६,एकुण =१०२९७

* जिल्हा परिषद मराठी शाळेत एकुण मंजुर शिक्षक -४५९
कार्यरत-३१७
रिक्त -४२
पदविधरक मंजुर शिक्षक -९७
कार्यरत -७७
रिक्त -२०
पदोन्नती मुख्याध्यापक -३२
कार्यरत -१८
रिक्त -१४
केंद्र प्रमुख -०८
कार्यरत -०२
रिक्त -०७
विस्तार अधिकारी -०२
-----
सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद
मोडकळीस व मोठी दुरुस्ती आणि किरकोळ दुरुस्ती शाळा एकुण=२६
 एका शिक्षकाला तातपुर्ते केंद्रप्रमुख म्हणून दीलेले आहे.
------ 
तर
माध्यमिक शिक्षक 
मंजूर- १६
भरलेले-११
रिक्त- ५
पर्यवेक्षक- २ भरलेले
पुढील महिन्यात - ५ ते ६ मुख्याध्यापकासह शिक्षकसेवानिवृत्त होणारे
प्रभारी गटशिक्षणअधिकारी - विजय दुतोंडे हे तालुक्याचा गाडा हाकत आहेत.रिक्तपदे व प्रभारी राजमुळे उद्याचे होणारे भावी नागरीकांचे भविष्य अंधारात आहे, शासनाने कायमस्वरुपी रिक्त शिक्षक व कायमस्वरुपी तालचक्यास गटशिक्षणाधिकारी द्यावेत अशी मागणी जनतेतुन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या