Advertisement

Responsive Advertisement

बाळापूर रेल्वे गेटजवळ रस्त्याची पुन्हा तीच अवस्था.


धर्माबाद -येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेसमोरून जन्मभूमी ते कर्मभूमी या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेट जवळ वाहत्या पाण्याने भगदाड पडले असून पावसाळ्यात दरवर्षी हीच पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे गेटच्या जवळच रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनधारकांना त्रास होत आहे.
     रेल्वेलाईन शेजारील शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात या मार्गे येत असते त्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसाने रस्त्यावरील पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन धारकांना येथील खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथून रस्ता ओलांडत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडीवरून पडण्याच्या घटना घडत आहेत. तर पाणी जास्त असल्याने गाड्यांच्या इंजिन मध्ये पाणी जाऊन गाड्यांमध्ये बिघाड होत आहे. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते व एक शाळा सुद्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.  त्यामुळे याकडे विशेष लक्ष देऊन कायम उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या