Advertisement

Responsive Advertisement

अतीशय मनहेलावुन जाणा-या घटनेला मदतीची गरज


हदगाव (ता.प्र‌.विकास राठोड ) हदगाव तालुक्यातील मौज बामणि आबादी येथीलसंतोष टोपलवार यांणि आपल्या स्वता ची   पोटाची खळगी भरण्यासाठी उस तोडी सह मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाडा चालवणारे बामणी आबादी येथील संतोष टोपलेवाड  त्यांची पत्नी व  सतीश टोपलेवाड यांचे मोटारसायकल मागील आठवड्यात बरडशेवाळा बायपास जवळ झालेल्या अपघातात  दुदैवी निधन झाले. संतोष टोपलेवाड आपण कल्पनाही करू शकत नाही अस्या घरात राहतात.त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे.आई बाबा हरवलेले कृष्णा व ईश्वरी सध्या आजी आजोबा कडे राहतात.त्यांचे काम करण्याचेही वय नाही.अपघातात मिळणा-या मदतीला संबंधित टेम्पो पसार असल्याने इतर अडचणी खुप आहेत. त्यांना सुख दुःख शिक्षण ईतर आवश्यक गरजा उदरनिर्वाह चालवणे अवघड आहे. अस्या परीस्थितीला त्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांच्या कडे अजुन तरी कोणी  गेले नसल्याने आज त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली आहे.  त्यांना आपल्या मदतीचा हात देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होवून जमेल त्या पद्धतीने सहकार्य करावे.यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे.
मदत दोन्ही कुटुंबासाठी ७०/३० प्रमाणे देणे योग्य होइल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या