Advertisement

Responsive Advertisement

ज्या शाळेचा शिक्षण खेळाडू असते त्या शाळेचा विद्यार्थी हा लढावू असतो -आनंदा इंगळे

..-सोयगाव / विजय पगारे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ज्या जिल्हा परिषद प्रशालेत ज्ञानार्जनाचे शिक्षकांकडून शिक्षणाचे ज्ञान घेतले.त्याच शाळेत गेल्या चौदा वर्षा पासुन प्रभारी मुख्याध्यापक राहीलो.एक क्रीडा शिक्षक असुन मी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांना मोठे भाउ,आई,बाबा प्रमाणे वात्सल्य दिले शिक्षणा बरोबरच शारीरिक दृष्ट्या विकास व्हावा म्हणून क्रिडा मैदानावर कबड्डी,खो खो,हाॅलीबाॅल, कुस्ती खेळ शिकवले त्यामुळे कला गुणांना वाव ही मिळाला म्हणूनच " ज्या शाळेचा शिक्षक खेळाडू असतो " "त्या शाळेचा विद्यार्थी हा लढावू असतो " सहाशी असतो प्रभारी मुख्याध्यापक आनंदा इंगळे (ता.३०) शनिवारी सेवापुर्ती सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलले.
-
जि.प.प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक आनंदा गरबड इंगळे गेल्या १४ वर्षांपासून सोयगाव ला सेवेत आहेत,ते ३१ जुलै रविवारी सेवानिवृत्त होत आहे.या निमित्ताने शिक्षकवृंदानी सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन भैरवनाथ पत संस्थेचे संस्थापक प्रभाकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली केले होते . या भव्य दिव्य सोहळ्याच्या प्रसंगी सोयगाव नगर पंचायत अध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखा काळे, सोयगाव पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक सतीष पंडीत, आमखेडा ग्रा.प.सरपंच गजानन ढगे, गलवाडा ग्रा.पं.सरपंच पंजाबराव कुनघर, सदस्य रुपाली औरंगे, जावेद खालेख शेख,पी.पी.सोनवणे,पंकज लंगडे, विष्णू मापारी, सुनिल शेटे,नगरसेवक संदिप इंगळे,सतिष मंडवे,पी.के.बि-हारे, किरण पाटील,जयकृष्ण नाईक, सोनाजी,मिसाळ, राजेंद्र सिरसाठ,यशवंत चौधरी, माजी पोलीस पाटील कंकराळा भागवत पाटील सर्व तालुक्यातील शिक्षक, नागरीक, पत्रकार प्रामुख्याने हजर होते. 
यावेळी आनंदा इंगळे पुढे म्हणाले की, आम्ही बालपणी जेव्हा ज्ञानार्जन घेण्यासाठी जायचो आमचे शिक्षक आपला विद्यार्थी हुशार व्हावा म्हणुन मारायचे मात्र काळ बदलला आज विद्यार्थ्यांना मारले,रागावले तर त्यांचे पालक लागेच दुसऱ्या दिवशी रुद्रावतार धारण करून शिक्षकाला माझ्या पाल्याला का मारले म्हणून जाॅब विचारायला उभाच असतो.शासनाच्या धोरणानुसार शिकवत असतांना मारु नये कायदाच केला.चांगला आदर्श विद्यार्थी घडावा म्हणून मारावेच लागले,आम्हाला काय दर सहा महिन्यांनी पगार वाढ ही अटळच असतें,जसा पगार वाढ तसेच विद्यार्थी ज्ञानत ही वाढ झाली पाहिजे अशी तळमळ असते.मी १४ वर्षांपासून जि.प.प्र.सोयगाव ला सेवा दिली.सर्व पालकांचे आणि गावातील नागरिकाचे सहकार्य लाभले असेही प्र.मुख्याध्यापक इंगळे म्हणाले, दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर काळे, राजेंद्र दुतोंडे, जयकृष्ण नाईक,गलवाडा माजी सरपंच सुरेखा तायडे,भिमपुत्री सुशिला इंगळे,गलवाडा पोलीस पाटील मिलिंद सोनवणे,रुपचंद सरोदे,वृक्षाली सिरसाठ, भास्कर चौधरी, शिरिष जगताप आदींचे समायोजीत भाषण झाले.

* प्रभारी मुख्याध्यापक आनंदा इंगळे सेवानिवृत्त होत असल्याने या निमित्ताने गावक-यांनी  छत्रपती शिवाजी महाराज चौकातून २ कि.मी.गलवाडा निवासी गावा पर्यंत डीजे वाद्य वाजवत नाचत रॅली काढण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या