Advertisement

Responsive Advertisement

डाॕक्टर विलास राजपुत यांच्या बेजबाबदार पनामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसोयगाव - (विजय पगारे )
~~~~~~~~~~~

 तालुक्यातील डाभा गाव चे आरोग्य उप केंद्र हे दोन वर्षांपासुन डाॕक्टरांनी कुलुप ठोकुन केले बंद केल्यामुळे डाभा येथील स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्याविना  मोठे हाल होत आहेत. डाभा येथील गावक-यांना  सात ते आठ कीलोमीटर जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी येथे खाजगी रुग्नालयात जावं लागत आहे उपचारा साठी   मात्र... डाॕक्टर विलास राजपुत हे जाणून बुजून  प्राथमीक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष करतात,  डाॕक्टर   राजपुत  यांचा पुन्हा बेजबाबदार पणा उघड झाला आहे. वरिष्ठ अधीका-यांचे सतत  दुर्लक्ष असल्यामुळे हा मनमाणी कारभार लगातार सुरूच आहे   .
 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा आरोग्य केंद्राअंतर्गत  डाभा आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासुन कुलुप ठोकुन बंद असुन  डाॕक्टर राजपुत यांच मात्र ग्रामस्थांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे . परिणामी डाभा गावच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे . अनेक ग्रामस्थांना गॕसट्रो ची लागन झाल्याचे डाभा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि गावक-यांनी बोलतांना सांगितले आहे. सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्र हे १८  गावांचे केंद्र असुन या  १८  गावांचे सध्या आरोग्य सुविधा नसल्याने प्रचंड हाल हाल दिसुन येत आहे ,  वेळेवरती  रुग्नांचा उपचार केला जात नसल्याने सध्या पावसाळा सुरु असुन पिन्याच्या पाण्याची कोनतीही तपासणी डाॕक्टरांकडुन होत नसल्याने  गावक-यांच्या आरोग्याशी सध्या खेळ  खेळल्या जात आहे,  डाॕक्टर राजपुत हे उप केंद्रांना साधी भेट ही  देत नसल्यामुळे डाभा गावचे ग्रामस्थ ना ईलाजाने बाहेर गावी  खाजगी रुग्नालयात अव्वाच्या - सव्वा रुपये खर्चून वेळ पैसा उपचारावर खर्च होतोय  
शासनाने लाखो रुपये खर्च करुन डाभा गावात    आरोग्य उप केंद्रची ईमारत  उभारलेली असुन त्या ठीकाणी एक ही कर्मचारी थांबत नाही  त्यामुळेच  उप केंद्राचा कोनताही फायदा या गावक-यांना  होत नाही. या उप केंद्रा समोर पुर्ण घानीचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे  डाॕक्टर   राजपुत  हे मुख्यालयास वास्तव्य करुन राहत नसुन जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यांमध्ये वास्तव्यास आहेत.  त्यामुळे त्यांच  सावळदबारा आरोग्य केंद्राकडे नेहमी दुर्लक्ष असते या अगोदर त्यांच्या अनेक वेळेस वरिष्ठ अधीका-यांकडे तक्रारी केलेल्या आहेत,  डाॕक्टर राजपुत  सतत गैरहजर आणि बाहेर गावी वास्तव्य करुन राहतात  डाॕक्टर  राजपुत यांच्यावराती कोनतीही कारवाई आजतागत झालेली नाही. या अगोदर अनेक वेळेस प्रिंट मिडिया व  इलेक्ट्रॉनिक मिडिया ला या  डाॕक्टररांच्या बातम्या प्रसारीत झालेल्या आहे मात्र वरिष्ठ अधीकारी यांचा डाॕक्टर च्या  डोक्यावर आशीर्वाद रुपी हाथ  असल्यामुळे कोनतीही कारवाई होत नाही. सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे बेजबाबदार डाॕक्टर राजपुत  यांच्यावरती कधी व केव्हा कारवाई होणार या परीसरातील नागरीकांना  वेळेवरती केव्हा उपचार मिळनार असे अनेक प्रश्न सावळदबारा प्रारथमीक आरोग्य केंद्र  , डाभा  आणि १८ गावांच्या  परिसरामधे  नागरिकांना पडलेले आहे, 
शासन व प्रशासनातील वरिष्ठ अधीकारी या बेजबाबदार डाॕक्टर वरती कधी कारवाई करनार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या