Advertisement

Responsive Advertisement

नागरिकांच्या आरोग्यां संदर्भात कुठलीच तडजोड करणार नाही.- मुख्याधिकारी कांबळे 
 धर्माबाद- नागरिकांच्या आरोग्यां संदर्भात कुठलीच तडजोड करणार नाही अशी शाश्वती धर्माबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. नीलम कांबळे यांनी देत गेल्या आठ-दहा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे साचलेला कचरा तात्काळ उचलण्याचे फर्मान त्यांनी काढले असून आज स्वच्छ सूर्यप्रकाशात विद्युत गतीने धर्माबाद शहरात नगरपालिका प्रशासनातर्फे साफसफाई सुरू करण्यात आली आहे.
गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्माबाद शहरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. कर्मचारी उपलब्ध असूनही पावसामुळे साफसफाई करता येत नव्हती. नाल्या साफ करून रोडवर टाकलेले वेस्टेज पावसामध्ये पुन्हा पुन्हा सडून नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होत होता. पण कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. आज तर सकाळच्या सत्रात स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्माबाद शहरात विद्युत गतीने साफसफाईस सुरुवात झाली आहे.
सदरील साफसफाई करताना नागरिकांच्याही अक्षम्य चुका होत असल्याचे चित्र दिसत आहे. सुका व ओला कचरा हे एकाच ठिकाणी टाकला जात आहे. प्लास्टिकचा वापर, कपड्याच्या दुकानांमधील बॉक्स, यासह कितीतरी वेस्टेज रस्त्यावर बे-जवाबदारपणे टाकण्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनीही धर्माबाद शहराच्या साफसफाई मध्ये जबाबदारीने सहभागी होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया मुख्याधिकारी सौनिलम कांबळे यांनी देत, स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये आपली धर्माबाद नगरपालिका सक्रिय सहभाग नोंदवित असून त्यासाठी उघड्यावर लघु शंका व सौच्यास बसू नये, बंदी असलेले कुठलेच पदार्थ किंवा वस्तू न वापरता बंदी नसलेले सर्व वस्तू वापराव्यात, विघटनशील टाकाऊ वस्तु वेगवेगळ्या पद्धतीने घंटागाडीत द्याव्या जेणेकरून त्यांची विल्हेवाट लावून नागरिकांचे आरोग्य जपता येईल, सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या उत्पादनावर बंदी असून व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांनी  प्लास्टिक वापरताना आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करीत नागरिकाच्या आरोग्य संदर्भात मी कुठलीही तडजोड करणार नसल्याची मुख्याधिकारी सौ.निलम कांबळे यांनी दिली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या